शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी घेऊन काढली जातात अतिक्रमणे

By admin | Updated: July 4, 2017 23:31 IST

सुपारी घेऊन काढली जातात अतिक्रमणे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रात पैसे घेऊन अतिक्रमणे काढली जात आहेत, अधिकारी अतिक्रमण काढण्यासाठी सुपारी घेतात, असा गंभीर आरोप मंगळवारी महासभेत नगरसेवकांनी केला. गटनेते किशोर जामदार यांनी मिरजेतील एका कुंपणभिंतीच्या अतिक्रमणावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लतिफ पठाण कॉलनीतील अतिक्रमणासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब सावंत यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोरच ठिय्या मारला. अतिक्रमण काढल्याशिवाय कामकाज सुरू करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर महापौरांनी अतिक्रमण हटाव पथकाला तातडीने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा झाली. सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब सावंत यांनी, लतिफ पठाण कॉलनीत ३० फुटी रस्त्यावरील अतिक्रमण अद्याप काढले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. या अतिक्रमणाबाबत गेले सात ते आठ महिने पाठपुरावा करीत आहे. आयुक्तांकडे कित्येकवेळा बैठका झाल्या. पण अतिक्रमण निघाले नसल्याचे सांगत त्यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. मागासवर्गीय समितीच्या सभापती स्नेहल सावंत, राजू गवळी, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, मनगू सरगर या सदस्यांनीही त्यांना साथ देत महापौरांच्या आसनासमोरच ठिय्या मारला. अतिक्रमण हटल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही, सावंत यांनी वारंवार पाठपुरावा केल्याचे कबूल करीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. पण त्यांच्या बदल्या झाल्याने अतिक्रमण जैसे थेच राहिले आहे. त्यात पोलिस संरक्षण घेऊन अतिक्रमण हटविले जाईल, असे सांगितले. पण त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. अखेर महापौर शिकलगार यांनी मालमत्ता व्यवस्थापक वैभव वाघमारे यांना अतिक्रमण पथकासह तातडीने अतिक्रमण काढण्यासाठी पाठविले. याचवेळी गटनेते किशोर जामदार यांनी, मिरजेतील कुंपणभिंत बेकायदेशीरपणे हटविल्याचा मुद्दा उपस्थित केला. अधिकारी पैसे घेऊन अतिक्रमण काढतात, असा गंभीर आरोपही केला. यावेळी अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. एका बाजूने अतिक्रमण न काढता, विशिष्ट अतिक्रमणेच काढण्यावर घोरपडेंचा भर होता. त्यांनी कुठलेही मार्किंग न करता अतिक्रमण हटविले. याबाबत आयुक्तांनी दूरध्वनी करून त्यांना सूचना केल्या होत्या. पण तरीही त्यांनी ऐकले नाही. त्यांना या पदावर नेमलेच कसे? असा सवाल जामदार यांनी उपस्थित केला. लोकशाही दिनात तक्रार होताच सायंकाळी अतिक्रमण काढण्याइतपत प्रशासन कधी सुधारले, असा सवाल सुरेश आवटी यांनी केला. विष्णू माने म्हणाले की, सभागृह नेत्यांच्या दूरध्वनीला अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यांच्यामागे कुणाचा तरी वरदहस्त असावा. घोरपडेंकडे हिंमत असेल तर त्यांनी लतिफ पठाण कॉलनीतील अतिक्रमण आजच काढून दाखवावे. गौतम पवार यांनी, राममंदिर चौकातील एक हातगाडा अधिकाऱ्यांनी हटवून बिल्डरला वाळू, खडी ठेवण्यासाठी फूटपाथ रिकामा करून दिला आहे, असे सांगून, अधिकाऱ्यांनी बिल्डरची सुपारी घेतली आहे का, असा सवाल केला. प्रशांत पाटील- मजलेकर यांनी, अकार्यक्षम अधिकाऱ्याकडे पदभार दिल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगितले. अखेर अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे, असा दम भरत, ज्येष्ठ नगरसेवकांचा सन्मान करा, असा सल्लाही महापौरांनी दिला. दिलीप घोरपडेंना पदावरून हटविलेगटनेते किशोर जामदार यांनी अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांना सभेत धारेवर धरले. मिरजेतील अतिक्रमण हटविताना घोरपडेंनी चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केली आहे. कुठलेही मार्किंग न करता अतिक्रमण हटविले. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी, ‘कोण किशोर जामदार?’ असे उद्धट उत्तर दिले. त्यांना तांत्रिक कामाची माहिती आहे. ते कनिष्ठ लिपिक असताना वरिष्ठ पद कसे देण्यात आले? त्यांची पदोन्नती कोणत्या निकषात करण्यात आली? असे म्हणत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. अखेर महापौर शिकलगार यांनी घोरपडे यांना पदावरून हटविण्याचे आदेश आयुक्तांना दिले.