शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिसिंहांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण

By admin | Updated: December 2, 2015 00:37 IST

येडेमच्छिंद्रेत उद्या उद्घाटन : गणपतराव देशमुख यांची उपस्थिती

निवास पवार -- शिरटे--क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याच्या नयनमनोहारी सुशोभिकरणाचे उद्घाटन गुरुवारी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्याहस्ते करण्यात येत आहे. स्वातंत्र्य चळवळीनंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ज्या शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला, त्याच पक्षात अखेरपर्यंत राहणारे आमदार गणपतराव देशमुख यांच्याहस्ते हा कार्यक्रम होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव यादव यांनी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा परिसरात सुशोभिकरणाचे काम हाती घेतले होते. ते नुकतेच पूर्ण झाले आहे. क्रांतिसिंहांचा आदर्श लहान, थोरांच्या डोळ्यासमोर राहावा, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे सुशोभिकरणाचे काम यादव यांनी पूर्ण केले. गुरुवार, दि. ३ रोजी शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांच्याहस्ते सायंकाळी ४.३० वाजता याचे उद्घाटन होत आहे. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत. येडेमच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावात त्यांच्याच गावात असलेल्या त्यांच्या पुतळा परिसराची दुरवस्था झाली होती. पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस धबधबा, बगीचा, फुलझाडे, आकर्षक विद्युत रोषणाई, पुतळ्यासाठी संरक्षक कठडा व छत आदी कामे अत्यंत चांगल्या पध्दतीने करुन घेतली आहेत. या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणामुळे चौकाची शोभा आता वाढणार आहे. सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार कार्यक्रमास माजी खासदार विश्वासराव पाटील, सोनहिरा सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, नानासाहेब महाडिक, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, क्रांतिसिंहांचे नातू अ‍ॅड. सुभाष पाटील हे सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात सर्जेराव यादव यांचा सत्कारही होणार आहे.सर्वपक्षीय मान्यवरांच्याहस्ते क्रांतिसिंहांच्या पुतळा सुशोभिकरणाच्या उद्घाटनामुळे त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे. उद्योजक सर्जेराव यादव यांनी पुतळा सुशोभिकरणाचे काम उत्कृष्ट केले आहे. यामुळे चौकाची शोभा वाढली आहे. यापुढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुतळा व परिसराच्या देखभालीचे काम करू.- संजय पाटील, सरपंच, येडेमच्छिंद्र.