शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

इस्लामपूर : नगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरातील पुतळे आणि त्यांचा परिसर दुर्लक्षित राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जाग्या झालेल्या ...

इस्लामपूर : नगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरातील पुतळे आणि त्यांचा परिसर दुर्लक्षित राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने येथील तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. एक लाख रुपयांचा खर्च या पुतळा सुशोभिकरणावर होणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

येथील तहसील कार्यालयासमोर लोकवर्गणीतून नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वच्छता व दैनंदिन पूजन करण्याचे काम शिवप्रतिष्ठानकडून केले जाते. याच परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज पुष्पहार अर्पण करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा रंग वातावरणीय परिणामामुळे बदलला होता. तसेच येथील पाण्याचा कारंजा गेल्या काही दिवसांपासून बंद होता. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये सोमवारी पुतळ्याच्या रंगरंगोटीची आवश्यकता असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधण्यात आल्यावर, पालिका प्रशासनाने सोमवारी सायंकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रंगरंगोटीची लगबग सुरू केली होती.

फोटो- ०८०२२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर न्यूज १ : इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुशोभिकरणासाठी सुरू झालेली लगबग.