याप्रकरणी बाळू तुकाराम कोळी, स्वाती बाळू कोळी, रेखा बाळू कोळी, प्रवीण बाळू कोळी आणि जालिंदर यशवंत कोळी (सर्व रा. कोकणी गल्ली, मिरज) यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकणे गल्लीतील पूजा भोसले या गुरुवार, दि. १ रोजी रात्री दहा वाजता जावेच्या घरी जात होत्या. त्यावेळी जावेच्या घराशेजारी राहणाऱ्या रेखा व स्वाती कोळी यांच्याशी रस्त्यावर लावलेल्या दुचाकीवरून वाद झाला. त्यावेळी दोघींनी ‘आम्ही गाड्या रस्त्यातच लावणार, काय करायचे ते कर’ अशी धमकी दिली. पूजा या घरी गेल्यानंतर रात्री ११ वाजता या सर्व जणांनी त्यांच्या घरी येऊन ‘तू माझ्या मुलीला काय बोललीस’ असे म्हणून मारहाण करून फुटलेल्या बांगड्याने हातावर ओरखडले. ‘तुझे घर पेटवतो व विकायला लावतो’ असे धमकावल्याची तक्रार पूजा भोसले यांनी दिली आहे.