शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बावडेकर, केळकर यांचे नगरसेवकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:04 IST

बावडेकर, केळकरयांचे नगरसेवकपद रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेतील भाजपशी संबंधित नगरसेवक युवराज बावडेकर व स्वरदा केळकर या दोघांचे नगरसेवक पद तीन वर्षासाठी रद्द करण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी मंगळवारी दिले. याबाबत स्वाभिमानी विकास आघाडीचे माजी गटनेते शिवराज बोळाज यांनी दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याबाबत याचिका दाखल केली होती. स्वाभिमानी आघाडीचे वकील अमोल चिमाण्णा यांनी ही माहिती दिली. स्वाभिमानी आघाडीत शिवसेना, भाजप, मनसे, जनता दल व अपक्ष अशा अकरा नगरसेवकांचा समावेश आहे. महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वाभिमानी आघाडीला स्वतंत्र गट म्हणून विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळाली होती. वर्षभरातच स्वाभिमानी आघाडीची शकले झाली असून, या आघाडीतील तीन नगरसेवकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. आघाडीची सूत्रे शिवसेनेचे गौतम पवार व गटनेते शिवराज बोळाज यांच्याकडे आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान स्वाभिमानीच्या नगरसेवकांत फूट पडली होती. त्यानंतर शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्षही आघाडीत सुरू झाला होता.गतवर्षी स्थायी समिती सदस्य निवडीवेळी भाजपचे युवराज बावडेकर व स्वरदा केळकर यांनी तत्कालीन गटनेते शिवराज बोळाज यांच्याविरूद्ध भूमिका घेतली होती. स्वाभिमानीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केल्याने या गटाच्या दोन जागा रिक्त ठेवाव्यात, असा आग्रह त्यांनी महासभेत धरला होता. त्यामुळे स्वाभिमानी आघाडीला धक्का बसला. अखेर स्वाभिमानी आघाडीला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थायी समितीच्या निवडी झाल्या होत्या. या घडामोडीनंतर स्वाभिमानी आघाडीने बावडेकर व केळकर यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवावे, यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. यात युवराज बावडेकर यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी गटनेता व स्थायी समितीतील एक जागा देण्याची मागणी केली होती. बावडेकर यांची मागणी पक्षविरोधी आहे, यासंदर्भात महापालिका अधिनियम, उच्च व सर्वोच्च न्यायालयातील निकालाचे दाखले देत, त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी बोळाज यांनी केली होती. तसेच स्वरदा केळकर यांनी स्थायी सदस्य निवडीवेळी गटनेत्यांना आव्हान दिले. गटनेत्यांनी दिलेल्या नावाला आक्षेप घेतला. ही कृतीही पक्षविरोधी असल्याचे बोळाज यांनी याचिकेत म्हटले होते.त्यावर विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी सुरू होती. तत्कालीन विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी झाली. त्यानंतर विद्यमान विभागीय आयुक्त दळवी यांच्यासमोरही सुनावणी झाली. दळवी यांनी या दोन्ही नगरसेवकांना तीन वर्षासाठी अपात्र ठरविण्यात आल्याचे स्वाभिमानी आघाडीचे वकील अ‍ॅड. चिम्माण्णा यांनी सांगितले. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रशासनाला अद्याप आदेश नाहीत१ युवराज बावडेकर व स्वरदा केळकर यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचे स्वाभिमानी विकास आघाडीचे वकील अमोल चिमाण्णा यांनी सांगितले. याबाबत महापालिका प्रशासनाला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सायंकाळपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नव्हते. २ तसेच बावडेकर व केळकर यांनाही कारवाईची माहिती नव्हती. त्यांनीही कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगितले. याबाबत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा दूरध्वनी व्यस्त होता. योग्य तिथे दाद मागू : युवराज बावडेकरनगरसेवक पद अपात्र ठरविण्यात आल्याचे समजले असले तरी, अद्याप विभागीय आयुक्तांचा आदेश हाती आलेला नाही. विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत आल्यानंतर योग्य त्या ठिकाणी दाद मागू. न्यायालयात जाऊन याविरोधात याचिका दाखल करू. तिथे आम्हाला निश्चित न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया युवराज बावडेकर यांनी दिली. तसेच स्वरदा केळकर म्हणाल्या की, असा कोणताही आदेश आम्हाला प्राप्त झालेला नाही.