शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात रंगणार दिग्गजांची लढाई

By admin | Updated: October 30, 2016 23:28 IST

काँग्रेस-भाजप आमने-सामने : शिवसेना; अपक्षही रिंगणात

कडेगाव : कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस आणि भाजपमधील काही दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. ही निवडणूक या दिग्गज उमेदवारांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. येथे कॉँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य सामना रंगणार असला तरी, अपक्ष आणि शिवसेनेच्या काही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. कडेगाव ग्रामपंचायतीचे नागरपंचायतीत रूपांतर झाले आणि यानंतर आता कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. येथे कॉँग्रेस आणि भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये कॉँग्रेसकडून कडेगावचे माजी सरपंच प्रशांत ऊर्फ राजू जाधव यांनी प्रभाग क्र. १६ मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. राजू जाधव सरपंच असताना कडेगाव नगरपंचायतीची घोषणा झाली. यामुळे त्यांना फक्त ७ महिने सरपंचपदी संधी मिळाली होती़. मागील पंचवार्षिकमध्ये सरपंचपद भूषविलेले विजय शिंदे यांनी प्रभाग क्र. १७ मधून कॉँग्रेसच्या चिन्हावर अर्ज दाखल केला आहे. याशिवाय कडेगावचे माजी उपसरपंच अविनाश जाधव यांच्या पत्नी आकांक्षा जाधव यांनी प्रभाग क्र. ९ मधून कॉँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. याशिवाय सागरेश्वर सूतगिरणीचे माजी अध्यक्ष गुलाम पटेल यांचे चिरंजीव साजिद पटेल यांनी प्रभाग क्र. ४ मधून कॉँग्रेसकडून अर्ज भरला आहे. येथील नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. यामुळे या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागात काँग्रेस आणि भाजप दोन्हीकडून तुल्यबळ महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. विशेषत: खुल्या प्रवर्गातील तसेच दिग्गज उमेदवार असलेल्या प्रभागात लक्षवेधी लढती होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासाठी कडेगावची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. (वार्ताहर) तुल्यबळ उमेदवार भाजपकडून युवा नेते उदयसिंह देशमुख यांनी प्रभाग क्र. ७ मधून अर्ज भरला आहे. भाजपनेही तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. दोन्हीकडून सर्व १७ जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.