शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात कोलमडलेल्या कॉँग्रेसला नेत्यांचा आधार

By admin | Updated: September 9, 2016 01:14 IST

आगामी निवडणुकांवर लक्ष : राष्ट्रवादीच्या वटवृक्षाखाली वाढ खुंटली

अशोक पाटील --इस्लामपूर --वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी फोफावली आहे. मात्र इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या वटवृक्षामुळे काँग्रेसची वाढ खुंटली आहे. तथापि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे नेते इस्लामपुरातील कार्यकर्त्यांना आधार देण्यास सरसावले आहेत.वाळवा व शिराळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पेठनाक्यावरून काँग्रेसचा रथ हाकला जात होता, परंतु काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी राष्ट्रवादीला हाताशी धरून कुरघोड्या करत पेठनाक्यावरील काँग्रेस संपुष्टात आणली आहे. तेव्हापासून वाळवा तालुक्यासह इस्लामपूर शहरात काँग्रेसला खमके नेतृत्व लाभलेले नाही. तालुका पातळीवर सी. बी. पाटील (कामेरी), बाळासाहेब पाटील (साखराळे), जितेंद्र पाटील (बोरगाव), आनंदराव पाटील (येडेनिपाणी), वैभव पवार, विजय पवार (इस्लामपूर) यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या यादीत नाव घेण्यासारखा नेता उरलेला नाही. आता यांना बळकटी देण्यासाठी जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सदाशिवराव पाटील सरसावले आहेत.गेल्या पाच वर्षात शहरात सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही प्रश्न काँग्रेसने सोडविलेले नाहीत. तालुक्यातील काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले आहे.दिग्गजांचा रामरामआमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, डॉ. प्रताप पाटील, अभिजित पाटील यांनी काँग्रेस वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. परंतु शिराळा तालुक्यात दोन शिवाजीराव एका म्यानात राहू शकले नाहीत. याचा फटका शिवाजीराव नाईक यांना बसला. त्यांनी काँग्रेस सोडून विकास आघाडी स्थापन केली. काँग्रेसमधील गटबाजीमुळे या सर्व नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याने इस्लामपूर पालिका निवडणुकीतही काँग्रेस उतरणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या नवख्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. - जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य, बोरगाव