शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बसाप्पाचीवाडी-डफळापुरात पाणीप्रश्नावरून संघर्ष पेटला

By admin | Updated: January 14, 2015 23:19 IST

समझोत्याची गरज : सहा दिवसात दोन वेळा काम बंद

डफळापूर : डफळापूर (ता. जत) राष्ट्रीय पेयजल योजनेत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. ही योजना होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांचा होत असलेला तीव्र विरोध, कवठेमहांकाळ पोलिसांची बघ्याची भूमिका, बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याची गरज, तसेच डफळापूर ग्रामस्थांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची आवश्यकता असताना, दोन्ही गावात संघर्ष वाढतच चालला आहे.डफळापूरसाठी २0११ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून बसाप्पाचीवाडी तलावातून नळपाणी पुरवठा योजनेसाठी साडेसात कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. या योजनेला निधी देण्यास शासनाने सुरुवातीपासून टाळाटाळ केली. असे असताना ठेकेदाराने आतापर्यंत पावणेतीन कोटीची कामे केली आहेत. गेल्या आठवड्यात डफळापूर योजनेचे काम बसाप्पाचीवाडी तलावात पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. सहा दिवसात दोन वेळा बसाप्पाचीवाडी येथील काही ग्रामस्थांनी काम बंद पाडले. डफळापूर योजना होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थ विरोध करीत आहेत. डफळापूरकरांची तहान भागविण्यासाठी बसाप्पाचीवाडी गावच्या ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. डफळापूर योजनेतून पाणी गाव व वाडी-वस्तीसाठी जात नसून ते पाणी शेतीसाठी जात असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. दोन्ही गावांचा संघर्ष विकोपाला जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)दोन संशयित ताब्यातडफळापूर पाणी योजनेचे काम बंद पाडणाऱ्या बसाप्पाच्यावाडी येथील भारत ज्ञानदेव ओलेकर व दिलीप विलास लोखंडे यांना कवठेमहांकाळ पोलिसांनी आज (बुधवारी) ताब्यात घेतले. अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.