शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

निविदेतील कामे बोगसच, न्यायालयात जा!

By admin | Updated: May 12, 2017 23:46 IST

निविदेतील कामे बोगसच, न्यायालयात जा!

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेतील कामे बोगस असल्याच्या आरोपावर जिल्हा सुधार समिती ठाम आहे. हा आरोप महापौर, नगरसेवक व अधिकाऱ्यांना मान्य नसेल, तर त्यांनी न्यायालयात जावे. सुधार समितीच्यावतीने येत्या रविवारी चार वाजता स्टेशन चौकात निविदेवर खुली चर्चा आयोजित केली आहे. त्यामुळे प्रशासन, पदाधिकारी, नगरसेवकांनी तिथे येऊन जाहीर चर्चा करावी, असे आव्हान कार्यवाह अ‍ॅड. अमित शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिले.ते म्हणाले की, पावसाळ्याचे कारण देत घाईगडबडीत कामे उरकण्याचा डाव महापालिकेने आखला आहे. पालिकेतील सत्ताधारी व प्रशासन पावसाळ्याच्या तोंडावर कामे करण्यासाठी सरसावले आहे. नोव्हेंबरपासून ते झोपले होते का? काही कामे सध्या सुरू आहेत. त्यांच्या निविदा काढल्या आहेत. हा केवळ मॅनेज ठेकेदारीचाच भाग आहे. अत्यावश्यक सेवा आणि गरज म्हणून कामे दाखविली जात आहेत. निविदा प्रक्रियेतून स्पर्धा झाली असती, तर महापालिकेचे नुकसान टळले असते. पण साखळीतून हा लुटीचाच प्रकार आहे. ठेकेदारांना ठरवून आणि त्या-त्या दराने कामे करून सगळ्यांचेच कल्याण करण्याचा हा उद्योग आहे. तो सुधार समिती होऊ देणार नाही. महापौर, नगरसेवक, प्रशासनाकडून कामे योग्य असल्याचा खुलासा केला जात आहे. पण केलेल्या घोटाळ्याच्या आरोपावर आम्ही ठाम आहोत. महापालिकेकडून बोगसगिरी होत नसेल तर मिरजेतील निविदा प्रक्रिया का रद्द केली? घोटाळ्याचे आरोप मान्य नसणाऱ्यांनी सुधार समितीविरोधात खुशाल न्यायालयात जावे. सुधार समितीच्यावतीने येत्या रविवारी स्टेशन चौकात निविदेबाबत जाहीर चर्चा आयोजित केली आहे. त्यावेळी महापौर, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी या चर्चेत सहभागी होऊन खुलासा करावा. त्यासाठी नगरसेविकांचे पती, नातेवाईकांनी फिरकू नये. जर ते आले तर अवमान होईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. महापालिकेतील बोगस कारभाराचा आम्ही स्लाईड शोद्वारे पंचनामा करणार आहोत. शिवाय सोमवारी विभागीय आयुक्तांकडे जाऊन तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मदनभाऊ स्मारकासाठी हजाराची देणगीमहापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या स्मारकावर दोन-अडीच कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. पुतळ्याचा खर्च सहा लाख की १६ लाख, याचा प्रशासनाने खुलासा करावा. मदनभाऊंवर प्रेम असणाऱ्या नेत्यांनी निधी गोळा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी आवश्यक निधी जमा करावा. सुधार समितीच्यावतीने आम्हीही एक हजार रुपये देतो, असेही शिंदे म्हणाले.