व्यवस्था करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी महापालिकेचे अधिकारी, मूर्तिकार, विक्रेत्यांच्या बैठकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर
कारवाईचा इशारा देण्यात आला.
मिरज हायस्कूल
मैदानावर महापालिकेकडून वीज, पाण्यासह आवश्यक सोयी करण्यात येणार आहेत. यामुळे कोणीही, मूर्तिकार, विक्रेत्यांनी रस्त्यावर कोठेही विक्री व गर्दी करू नये अशा सूचना देण्यात आल्या. रस्त्यावर मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी महापालिकेने केलेल्या नियोजनाप्रमाणे नियमांचे पालन करून मूर्ती विक्री करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस महापालिका साहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, दत्तात्रय गायकवाड, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे व इतर अधिकारी उपस्थित होते. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.