शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद बरखास्तीच्या प्रस्तावाचा बडगा शिस्तीसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST

कायद्याने दिलेली कर्तव्ये पार पाडण्यास सदस्य सक्षम नसल्यामुळे अधिनियमातील कलम २६० प्रमाणे जिल्हा परिषद बरखास्त करावी, असा प्रस्ताव तयार ...

कायद्याने दिलेली कर्तव्ये पार पाडण्यास सदस्य सक्षम नसल्यामुळे अधिनियमातील कलम २६० प्रमाणे जिल्हा परिषद बरखास्त करावी, असा प्रस्ताव तयार करून गुडेवारांनी राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. या कारवाईमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभेत बेकायदेशीर ठराव करणे अंगलट येऊ शकते, याची जाणीव सदस्यांना झाली. कामे वाटून देण्यासाठी सदस्यांच्या शिफारशीची सक्ती करता येत नाही, हेही या कारवाईमुळे दिसून आले.

दरम्यान, गुडेवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मी भ्रष्टाचारमुक्त विकासकामे करण्यासाठी आलो आहे. जिल्हा परिषदेत सहा सदस्य सोडल्यास उर्वरित ५४ सदस्य प्रामाणिक आहेत. जिल्हा परिषदेच्या बरखास्तीमुळे ५४ सदस्यांवर अन्याय होणार आहे. तथापि, एकाही सदस्याचे सदस्यत्व रद्द होणार नाही. अधिनियमातील कलम २६० प्रमाणे सदस्यत्व रद्द होऊ शकते, याची जाणीव त्यांना करून देणे एवढाच हेतू यामागे आहे, पण सदस्यांनी यापुढे नियमाने काम करावे, चुकीचे ठराव घेऊन गोंधळ करू नये, जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी शक्ती खर्ची करावी. मात्र, काही सदस्यांच्या कारभारात सुधारणा झाली नाही, तर एका दिवसात मुुंबईला जाऊन मी सदस्यत्व रद्दच्या फाईलवर सही घेऊन येऊ शकतो.

चौकट

सीईओ म्हणतात, वादात अडकायचे नाही

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी बरखास्तीच्या कारवाईस विरोध केला आहे. ते म्हणाले की, मला जिल्ह्याचा विकास करायचा असून, कोणत्याही वादात अडकायचे नाही. अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांवर कारवाई करून मी एकटा विकासकामे करू शकणार नाही. चूक असेल, तर निश्चित कठोर कारवाई होईल, पण किरकोळ चुकीसाठी कोणावरही टोकाची कारवाई होणार नाही.