चरण (ता. शिराळा) येथील मुंबईस्थित गणेश मित्रमंडळ व चरण ग्रामस्थ यांच्या वतीने बी. के. नायकवडी यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
आ. नाईक म्हणाले की, बी. के. नायकवडी यांच्या रूपाने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांचे पाईक असणारे व कार्यतत्पर नेतृत्व जनतेला हवे होते. जे लोकांना हवे तेच पक्षाने केले. या माध्यमातून तळागाळातील, शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते तळमळीने काम करतील.
यावेळी भारत पाटील, सूर्यकांत घोलप, श्रीरंग नायकवडी, ज्ञानदेव नायकवडी, रामचंद्र नायकवडी, शामराव नायकवडी, संपतराव जाधव, पांडुरंग नेर्लेकर, सोनाली नायकवडी आदी उपस्थित होते. आभार धर्मराज शिंगमोडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन किरण शिंदे यांनी केले.
चौकट-
पन्नास वर्षांनंतर चरण संधी
चरण येथील विष्णू केरू नायकवडी यांना १९६७ ते १९७२ या कालावधीत शिराळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी संधी मिळाली होती. त्यानंतर तब्बल पन्नास वर्षांनंतर चरण गावाला बी. के. नायकवडी यांच्या रूपाने उपसभापतीपदी संधी मिळाली आहे.
फोटो-०६वारणावती१
फोटो- शिराळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बी.के. नायकवडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करताना आ. मानसिंग भाऊ नाईक व अन्य मान्यवर.