सांगली : विधानसभा निवडणुकीच्या कालावधित बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांना अद्याप भत्ता मिळाला नाही. दिवाळी संपण्याच्या आत हा भत्ता मिळेल, अशी पोलीस अपेक्षा बाळगून होते. मतदान अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना तातडीने भत्ता देण्यात आला. पोलिसांना मात्र खात्यावर जमा करतो, असे सांगण्यात आले आहे.विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या कालावधित पोलिसांच्या साप्ताहिक सुटट्या व रजा बंद करण्यात आल्या होत्या. निवडणूक शांततेत पार पाडण्यात पोलिसांचा मोठा वाटा असतो. परंतु याच पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शेकडो पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांना बजावलेल्या कर्तव्याचा मोबदला मिळणे अपेक्षित असते. लोकसभा निवडणुकीत केलेल्या बंदोबस्ताचा भत्ता मिळाला आहे. निवडणूक कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये बरीच तफावत आहे. मतदान अधिकाऱ्याला दीड हजार ते सतराशे, मतदान कर्मचाऱ्याला तेराशे व दीड हजार, मतदान शिपायाला हजार ते बाराशे व पोलिसांना पाचशे ते आठशे रुपये असा अंदाजे भत्ता आहे. भत्त्याची ही रक्कम पोलिसांच्या खात्यावर जमा केली जाते. (प्रतिनिधी)सुटट्या, रजा पुन्हा सुरुगणेशोत्सव, नवरात्रोत्सवामध्ये सुटट्या, रजा बंद होत्या. तोपर्यंत विधानसभा निवणुकीची आचारसंहिता लागली. दोन महिने सुटट्यापासून पोलीस वंचित होते. आता सुटट्या सुरु झाल्या.
पोलीस भत्त्याच्या प्रतीक्षेत!
By admin | Updated: October 26, 2014 23:31 IST