शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाड तलाठी कार्यालयात नोंदीबाबत टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST

कुपवाड : शहरातील तलाठयांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे शहरातील नागरिकांच्या बऱ्याच वर्षांपासून दस्तांच्या नोंदी प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून ...

कुपवाड : शहरातील तलाठयांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे शहरातील नागरिकांच्या बऱ्याच वर्षांपासून दस्तांच्या नोंदी प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून कोतवाल आणि कर्मचारी यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांच्याकडून उध्दट उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या गैरकारभाराच्या विरोधात कुपवाड शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र सदामते यांनी सांगलीतील अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तलाठी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

कुपवाड तलाठी कार्यालयामध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. एजंटाकडून आर्थिक तडजोडी झाल्यानंतर त्वरित नोंदी केल्या जात आहेत. शहरातील एका गुप्त ठिकाणी जाऊन या तडजोडी झालेल्या नोंदी केल्या जात आहेत. मात्र, शहरातील गोरगरीब नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या नोंदी प्रलंबित आहेत. तलाठी कार्यालयामध्ये नुकतीच नेमणूक झालेले तलाठी कार्यालयात वेळेवर हजर नसतात. वरिष्ठ कार्यालयात गेल्याचे खोटे सांगून तडजोडीच्या नोंदी करण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप रवीद्र सदामते यांनी केला आहे.

याबरोबरच शहरातील विद्यार्थ्यांचे दाखलेही वेळेवर दिले जात नाहीत. तलाठ्यांचा मोबाईल बंद असण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे गोरगरिबांना उध्दट बोलणे आणि वृध्द व महिलांना तासन्‌ तास ताटकळत थांबविण्याचे प्रकार बंद न झाल्यास येत्या आठ दिवसात तलाठी कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सदामते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी भाजपचे नेते माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, अशरफ वांकर, नगरसेवक संजय कुलकर्णी, माजी सभापती विनायक सिंहासने, किरण भोसले आदी उपस्थित होते.

फोटो ०८कुपवाड०२/ओळ :

कुपवाड शहर भाजपच्यावतीने अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रवींद्र सदामते, धीरज सूर्यवंशी, अशरफ वांकर, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने उपस्थित होते.