शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सूत उद्योगाला मदतीस टाळाटाळ

By admin | Updated: October 1, 2016 00:19 IST

जयंत पाटील : शासनावर टीका; ‘शेतकरी विणकरी’ची वार्षिक सभा उत्साहात

इस्लामपूर : सुताच्या व्यवसायात विजेचा खर्च मोठा आहे. कापसाचे चढे दर आणि सुताला भाव नाही. त्यातच अवास्तव वीज दर यामुळे राज्यातील वस्त्रोद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या व्यवसायाला मदत करण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केला. याचवेळी त्यांनी, या सर्व आव्हानांवर मात करीत शेतकरी विणकरी सूतगिरणी पूर्ण कार्यक्षमतेने सुरु असल्याचे गौरवोद्गारही काढले.राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाच्या कार्यस्थळावर शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची १४ वी वार्षिक सभा झाली, यावेळी ते बोलत होते. सूतगिरणीचे अध्यक्ष बबनराव थोटे अध्यक्षस्थानी होते. संकुलाचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील म्हणाले की, सूत व्यवसाय संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. कापूस व सुताच्या दरातील तफावतीमुळे व्यवसाय किफायतशीर राहिलेला नाही. कृत्रिम धाग्याचा वापर करुन तोटा कमी करण्यासाठी सूत निर्मिती सुरु आहे. या व्यवसायातील अनंत अडचणींमुळे जिल्ह्यातील सूतगिरण्यांची अवस्था ‘तीन दिवस बंद—एक दिवस सुरु’ अशी आहे. कापसाचे दर आटोक्यात आले तरच हा व्यवसाय टिकणार आहे. दिलीपराव पाटील म्हणाले, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत सूतगिरणी नावारुपाला आली. कर्ज न काढता, मिळणाऱ्या नफ्यातून सूतगिरणीचा विस्तार केला. दोन वर्षांपूर्वी २५ हजार स्पिंडलचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासनाची मदत झालेली नाही. कापूस—सूत दरातील वाढती तफावत, विजेचे वाढते दर यामुळे दिवसेंदिवस तोटा वाढतच आहे. अध्यक्ष बबनराव थोटे यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रसाद तगारे यांनी आदरांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक हेमंत पांडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. मुख्य लेखापाल एच. बी. मुलाणी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सौ. कमल पाटील, रोझा किणीकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी आभार मानले.यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, आष्टा पीपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप वग्याणी, ज्येष्ठ संचालक बशीर मोमीन, एम. एम. पाटील, उदय शिंदे, विश्वास धस, सुरेखा वाटेगावकर, जगन्नाथ पाटील, रघुनाथ मदने, शशिकांत पाटील, राजेंद्र दिंडे, प्रशांत थोरात, जय महाराष्ट्र सूतगिरणीचे अध्यक्ष संजय जाधव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, मारुती पेठकर उपस्थित होते. (वार्ताहर)अनुदानाची गरज : दिलीप पाटील यांचा इशाराहा व्यवसाय टिकविण्यासाठी वीज दरातील कपातीसह प्रति स्पिंडल ३ हजार रुपयांचे अनुदान शासनाने द्यावे. शासनाने मदत केली नाही, तर दिवाळीपर्यंत राज्यातील हा व्यवसाय ठप्प होईल, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिला.