शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सीमेवर औटपोस्ट सुरू

By admin | Updated: July 25, 2016 23:06 IST

मिरज ग्रामीणच्या पथकाचा तळ : अवैध धंद्यांना आळा बसणार

सुशांत घोरपडे -- म्हैसाळ --मिरज-कागवाड या महामार्गावर म्हैसाळजवळ कर्नाटक सीमेवर मिरज ग्रामीण पोलिसांनी तंबू ठोकून चेकपोस्ट सुरू केले आहे. त्यामुळे आता अवैध धंद्यांना आळा बसणार आहे. पोलिस अधीक्षकांनी म्हैसाळ येथे पोलिस चेकपोस्ट सुरू करून आंतरराज्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश मिरज ग्रामीण पोलिसांना दिले होते. त्यांच्या आदेशानुसार सीमारेषेवर पोलिसांनी तंबू ठोकला आहे. या महामार्गावरून दररोज शेकडो वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे चंदन, हुबळी मेड दारू, जनावरांच्या मांसाची आयात, गुटखा यांची तस्करी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कर्नाटकच्या अवैध धंदेवाल्यांनी सीमाभागाचा फायदा घेऊन आपले बस्तान चांगलेच बसविले आहे. त्यामुळे अवैध धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मटका तर अजूनही चालूच आहे. म्हैसाळ, नरवाड, आरग, बेडग, विजयनगर येथील मटका एजंटांना व बुकीमालकांना कोणतीही भीती राहिलेली नसल्याचे दिसून येते. मटका अजूनही चोरी-चोरी-चुपके-चुपके सुरूच आहे. होणारी कारवाई ही फक्त नावापुरतीच केली जाते, असा समज सर्वसामान्य नागरिकांचा झाला आहे. आता जिल्हा अधीक्षकांच्या आदेशानुसार आठ पोलिस कर्मचाऱ्यांची म्हैसाळ औटपोस्ट येथे नेमणूक होणार असल्याने, हे चित्र बदलणार, अशी अपेक्षा या भागातील नागरिक करू लागले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सध्या चार पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहेत. म्हैसाळ औटपोस्टसाठी जागा मिळावी म्हणून म्हैसाळ ग्रामपंचायतीकडे आपण अर्ज करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.