शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या कामांसाठी सत्ताधारी अलर्ट

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

खासदारांची आज तासगावात बैठक : पुतळ्याच्या कामाला सुरुवात

तासगाव : तासगाव नगरपालिकेत अनेक कामे रखडलेली आहेत. शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या कामांकडे ठेकेदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे कामे मुदतीत पूर्ण झाली नाहीत. निवडणुका तोंडावर आल्याने जनता या कामांच्याबाबतीत जाब विचारणार, असे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी अलर्ट झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी शिवाजी महाराजांचा पुतळा हलविण्यात आला असून, तातडीने नवीन चबुतऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली, तर शुक्रवारी कामांविषयी खासदार संजयकाका पाटील नगरसेवकांची बैठक घेणार आहेत.तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मार्चेबांधणी सुरूआहे. मात्र पालिकेत गेल्या साडेचार वर्षांत तासगावकरांना समाधानकारक कारभार झाला नाही. याबाबत जनतेतूनही नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून झालेली अनेक कामे रखडलेली आहेत, तर काही कामांच्याबाबतीत प्रत्यक्षात घोषणाच झाली आहे. याबाबत येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना अडचण निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने पालिकेत सत्ताधारी नगरेसकांची रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. तर शहरातील विकासकामांच्या अनुषंगाने शुक्रवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होणार आहे.शुक्रवारी छत्रपती शिवरायांचा पुतळा चबुतऱ्यावरून हलवण्यात आला. लवकरच तो पुरातत्व खात्याकडे जमा करण्यात येणार आहे. शिवरायांचा नवीन पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर पुतळा चबुतऱ्यासाठी पालिकेकडून २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूवी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याहस्ते चबुतऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. शुक्रवारी पुतळा कामासाठी पालिकेस मुहूर्त लागला असून, तातडीने काम पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुुरू करण्यात आले आहेत. (वार्ताहर)‘लोकमत’च्या बातमीने सत्ताधारी गतिमान दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या साडेचार वर्षांच्या कारभाराबाबत ‘लोकमत’मधून बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. ‘तासगावात विकासाचा पिंंगा अन् जनतेला ठेंगा’ या मथळ्याखालील बातमीतून पालिकेतील सर्वच सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांच्याबाबतीत भ्रमनिरास झाल्याची लोकांची भावना असल्याचे, तसेच रखडलेल्या कामांबाबतीत वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी हालचाली गतिमान केल्या असून, याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी खासदारांनी बैठक घेतल्याची चर्चा आहे.