शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडून अधिकारी धारेवर

By admin | Updated: May 17, 2017 23:18 IST

केंद्रीय पथकाकडून अधिकारी धारेवर

लोकमत न्यूज नेटवर्कम्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयातील भ्रूणहत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय वैद्यकीय समितीच्या पथकाने बुधवारी डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयाची तपासणी केली. भ्रूण पुरलेल्या जागेची आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचीही या पथकाने पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेबाबत या पथकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.केंद्रीय वैद्यकीय समितीच्या पथकात डॉ. सुषमा दुरेगा, डॉ. वीणा धवन, डॉ. जिग्नेश ठक्कर, डॉ. वर्षा देशपांडे यांचा समावेश होता. खिद्रापुरेच्या रुग्णालयाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी पथकास दिली. यावेळी गावातील नाना कांबळे, दीपक घोरपडे, अनिल हुल्ले, फरदीन मुल्ला यांनी आरोग्य विभागाबाबत तक्रारी मांडल्या. या प्रकरणात खिद्रापुरेला मदत करणाऱ्या कोणाचीही गय करू नये. गावात चालणाऱ्या बेकायदा भ्रूणहत्येची माहिती आम्ही लेखी स्वरूपात आरोग्य विभागाला कळवली होती; पण त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना याची माहिती कशी मिळत नाही? हे वैद्यकीय अधिकारी येथील आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी उपस्थित नसतात, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या आणखी काही डॉक्टरांची नावेही ग्रामस्थांनी पथकाला दिली. मात्र पथकाने डॉक्टरांची नावे सांगण्यास नकार दिला. त्यानंतर पथकाने म्हैसाळमधील आरोग्य केंद्राला भेट देऊन शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरुग्ण व औषध विभागांची पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्यामुळे या पथकाच्या निदर्शनास आले. याबाबत डॉ. वर्षा देशपांडे व केंद्रीय पथकाने वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. के. मोमीन, एन. व्ही. खंदारे यांना धारेवर धरले. गलथान कारभाराबाबत दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावले.नोटिसा देणार वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. के. मोमीन व एन. व्ही. खंदारे यांनी आरोग्य केंद्रातच वास्तव्यास रहावे, यासाठी कारवाईच्या नोटिसा देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी नसतात, याबाबत ग्रामसभेत निषेधाचा आणि कारवाईचा ठराव होतो आणि हा विषय आरोग्य विभागाला समजत कसा नाही, असा सवाल डॉ. देशपांडे यांनी केला. दोन रुग्णालयांचीही चौकशीया पथकाने म्हैसाळ येथील डॉ. टी. ए. चौगुले तसेच नरवाड रस्त्यावरील डॉ. यशवंत सावंत यांच्या रत्ना रुग्णालयाचीही प्राथमिक चौकशी केली. मात्र त्याबाबतचा तपशील समजू शकला नाही.