शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अशोक गायकवाड यांच्या भूमिकेकडे लक्ष

By admin | Updated: December 16, 2014 00:15 IST

विटा पालिका पोटनिवडणूक : नागरिकांत उत्सुकता

दिलीप मोहिते - विटा -विटा नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मधील एका जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पालीकेची २०११ ला एकत्रित निवडणूक लढविलेले अशोकराव गायकवाड या पोटनिवडणुकीत सत्ताधारी गटात सामील होणार, विरोधात जाणार, की तटस्थ राहणार, याकडे विटेकरांचे लक्ष लागले आहे.पालिकेच्या गत निवडणुकीत तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून कॉँग्रेसचे तत्कालीन आ. सदाशिवराव पाटील व त्यांचे कट्टर विरोधक व विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांनी एकत्रित येऊन पालिकेची निवडणूक लढविली. त्यावेळी २३ पैकी सदाशिवराव पाटील यांच्या गटाला १५, अशोकराव गायकवाड समर्थक गटाला ५, तर आ. अनिल बाबर यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला ३ जागा मिळाल्या होत्या.परंतु, स्वाभिमानी विकास आघाडीतील सौ. रूपाली श्रीमंत मेटकरी यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर त्यांच्या प्रभाग क्र. ६ मधील एका जागेसाठी १८ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे.विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांच्यात व सत्ताधारी गटात नगराध्यक्ष निवडीवरून दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे गायकवाड यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव पाटील यांच्या विरोधात प्रचार केला.अशोकभाऊंनी अद्यापपर्यंत आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ते सत्ताधारी गटाचे नेते माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्याशी युती करणार, की विरोधी गटाचे नेते आ. अनिल बाबर यांना पाठिंबा देणार, की तटस्थ राहणार याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे.विटा पालिकेच्या प्रभाग ६ मध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीबाबत अद्याप कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली नाही. परंतु, नामाप्र महिला उमेदवारासाठी जागा असल्याने उमेदवार मिळविण्यातच मोठी कसरत करावी लागते. ही पोटनिवडणूक कोणत्या पध्दतीने व कशी लढवायची, याचा निर्णय आमचे पाच नगरसेवक घेतील. मी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.- अशोकराव गायकवाड, अध्यक्ष, विकास आघाडी, विटामोर्चेबांधणीस वेग २०११ च्या निवडणुकीत सत्ताधारी गटात सहभागी झाल्यानंतर अशोकराव गायकवाड यांना पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र, अशोकभाऊंचे पाचही नगरसेवक विरोधात आहेत. त्यांना विरोधी स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगरसेवकांची साथ मिळाली आहे. परंतु, त्यातील एक नगरसेवक पद रिक्त झाल्याने त्यांच्याकडे आता सभागृहात ७ सदस्य संख्याबळ आहे. प्रभाग ६ साठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विरोधी गटासह सत्ताधारी व अशोकराव गायकवाड समर्थकांनी मोठी फिल्डिंग लावली आहे.