फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे प्रणव गुरव यांच्या निवासस्थानी खासदार संजयकाका पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची गावासाठी भरीव निधनी देऊन प्रलंबित कामे लवकरच मार्गी लाऊ. तसेच गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
निधी देऊन दिघंची (ता. आटपाडी) येथे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य प्रणव सूर्यकांत गुरव यांच्या निवासस्थानी खासदार संजयकाका पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समिती माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा नेते अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिघंची गावातील नागरिक व विद्यार्थ्यांची गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा आणण्याची मागणी केली. दिघंचीमधील वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याने खासदार पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, ग्रा. पं. सदस्य केशवराव मिसाळ, चंद्रकांत पुसावळे, बंडू मोरे, सोपान काळे, अजित मोरे, अविनाश रणदिवे, अमोल सावंत, प्रशांत चोथे, जोतीराम काटकर, दत्ता पांढरे, रमेश भोसले, आदित्य गुरव आदी उपस्थित होते.