शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नसंताेषी वृत्तीमुळे ‘कृष्णा’तील मनाेमिलनाचे प्रयत्न निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

बोरगाव : कृष्णा कारखान्याची एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनोमिलन हाच योग्य पर्याय होता. मी मनोमिलनाबाबत सर्व बाजूंनी तडजोड ...

बोरगाव : कृष्णा कारखान्याची एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनोमिलन हाच योग्य पर्याय होता. मी मनोमिलनाबाबत सर्व बाजूंनी तडजोड केली होती. पण पडद्यामागून सुत्रे हाकणाऱ्या काही विघ्नसंताेषी माणसांनी हे प्रयत्न उधळून लावल्याचा आरोप रयत पॅनलचे प्रमुख डाॅ. इंद्रजित मोहिते यांनी केला.

बोरगाव (ता. वाळवा) येथे रयत पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ व सभासद संपर्क दाैऱ्यात ते बाेलत हाेते. इंद्रजित मोहिते म्हणाले, कृष्णा कारखाना हा सभासदांच्या हक्काचा राहावा, यासाठी आम्ही संस्थापक पॅनलशी तडजोडीला तयार होताे. पण कोणी कोणाचे किती ऐकायचे यालाही मर्यादा हव्यात. स्वतःची निर्णयक्षमता बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार घेतलेले निर्णय हे नेहमी विनाशाचे कारण ठरतात. कृष्णा कारखाना सभासदांचा ठेवण्यासाठी सहकार व संस्थापक पॅनलला सत्तेपासून दूर ठेवायला हवे.

रयत पॅनलच्या माध्यमातून यशवंतराव मोहिते यांच्यापासून या कारखान्यात सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत. कृष्णेचे सभासद सुज्ञ आहेत. त्यामुळे सभासद या निवडणुकीत लबाड व भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवतील. विजय हा आता रयत पॅनलचाच आहे.

यावेळी मोहिते यांनी घरोघरी जाऊन सभासदांची भेट घेतली. ‘रयत’ला मतदानासाठी विनंती केली. यावेळी प्रा. अनिल पाटील. डाॅ. नितीन पाटील, विकास पाटील, विलास शिंदे, बैजू पाटील उपस्थित हाेते.

फोटो : २१ बाेरगाव १..२

ओळी : बोरगाव (ता. वाळवा) येथे रयतच्या प्रचार दाैऱ्यात इंद्रजित मोहिते, अनिल पाटील, डाॅ. नितीन पाटील सहभागी झाले हाेते.