शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 9, 2016 00:05 IST

सदाभाऊ खोत : इस्लामपृूरचा विकास आराखडा रद्द होणार

अशोक पाटील -- इस्लामपूर -आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात विरोधी आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. इस्लामपूर शहराचा विकास आराखडा रद्द करण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होतील आणि आराखडा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इस्लामपुरात मेळावा घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष स्वत:चा गट मजबूत करण्याच्या तयारीला लागला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी गल्लीबोळातील युवा नेतेही ताकद दाखवत आहेत. विरोधी गटात खमक्या नेता नसल्याने त्यांच्यामध्ये अजूनही ताळमेळ नाही. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. नियोजित विकास आराखड्याबाबत विरोधकांतच एकमत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वत: शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करुन, अन्यायी विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली. त्याला यश येण्याचे स्पष्ट संकेत खोत यांनी दिले.खोत म्हणाले की, पालिका निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न करणार आहोत. विरोधी गटात सुशिक्षित युवकांना जास्तीत जास्त संधी देऊन नवी पिढी राजकारणात उतरविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, जयकर पाटील, विजय कुंभार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक, महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्यासह राष्ट्रवादीविरोधात सक्रिय असलेल्या सर्व संघटनांना हाताशी धरुन चांगला पर्याय तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.इस्लामपूर शहरातील गुंडगिरी संपविण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज होती. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यारूपाने ती पूर्ण झाली आहे. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीसह विरोधी गटातील पदाधिकारी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यामुळे त्यांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. आगामी पालिका निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्षाची करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊनच लढा देण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागातील टॅलेंटवर पुन्हा एकदा मोहोरपालिकेच्या मागील निवडणुकीत विरोधकांना खासदार शेट्टी आणि खोत यांनी मदतीचा हात पुढे केला होता. आता मात्र हे दोघे पुढे येऊन विरोधकांची मोट बांधणार आहेत. त्याला शहरातील विरोधी युवा नेते कितपत सहकार्य करणार, यावरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. ऐन दुष्काळातही खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी स्वत:चा वाढदिवस इस्लामपुरातील मोठ्या हॉटेलमध्ये साजरा केला, शहरात डिजीटल फलक उभे केले. यावरून खोत यांच्या मुलालाही पालिका निवडणुकीचे वेध लागल्याचे स्पष्ट होत आहे.