सचिन चंदनशिवे आणि त्याची पत्नी मैना चंदनशिवे (३८) संजय जाधव यांच्या शेतात कामास गेले होते. दुपारी जेवणासाठी सुट्टी झाल्याने जाधव घरी गेले. पती-पत्नी शेतातच जेवत असताना त्यांच्यात भांडण सुरू झाले. सचिनने चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा दाबला. त्यामध्ये मैना बेशुद्ध पडल्या. तेव्हा घाबरून तो तिथून पळून गेला. थोड्या वेळाने शेताचे मालक संजय जाधव तिथे आले. तेव्हा त्यांनी बेशुद्धावस्थेत पडलेल्या मैना यांना पाहिले. मैना यांचे बंधू दतात्रय खरात यांना संपर्क साधला. येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अधिक उपचारासाठी सांगलीला पाठविण्यात आले. सध्या मैना यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी सांगितले. जखमी महिलेचे बंधू दतात्रय खरात यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. ए. पाटील करीत आहेत.
बोंबेवाडीत पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST