शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तलाठी भरती परीक्षेत कॉपीचा प्रयत्न करणारा अटकेत

By शरद जाधव | Updated: August 22, 2023 22:05 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संशयित; विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल

सांगली : शहरात सुरू असलेल्या तलाठी भरती परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास अधिकाऱ्यांनी पकडले. गणेश रतन नागलोत (वय २३, रा. लांडकवाडी जि. छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून एक मोबाईल, एक सपोर्टर, हेडफोन, लहान डबीतील इलेकट्रीक डिव्हाईस अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभरात तलाठी भरती परीक्षा सुरू आहेत.

मिरज रस्त्यावरील वसंतदादा पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे फिर्यादी नायब तहसीलदार आशिष सानप हे केंद्र निरीक्षक म्हणून कार्यरत होते. परीक्षेत एकूण २६१ उमेदवारांनी परीक्षा देत होते. मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास परीक्षा सुरु होण्यापूर्वी ते परीक्षार्थींची ओळखपत्र, हॉल तिकीट सह त तपासणी करत होते. यावेळी संशयित गणेश नागलोत हा परीक्षा देण्यासाठी आला होता. त्याने आपली बॅग आवारात ठेवली होती. या बॅग बाबत संशय वाटल्याने बॅगची तपासणी केली असता. त्यात मोबाईल, एक हेडफोन, प्लास्टिक डबी मध्ये डिव्हाईस, डिव्हाईसचे दोन बारीक सेल, तीन सिमकार्ड असे साहित्य मिळाले. या साहित्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

वन विभागाच्या भरती परीक्षेतही संशयित सांगलीत तलाठी भरती परीक्षेत कॉपी करण्याच्या तयारीत असलेला गणेश नागलोत याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्यावर वनविभागाच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी शिरोली पोलिसात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. 

पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर कनेक्शन गेल्या पंधरवड्यात झालेल्या वन विभागाच्या भरती परीक्षेत संपूर्ण राज्यभरात गैरप्रकार समोर आले होते. सांगलीतही असे प्रकार झाले होते. यातील सर्व संशयित हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. आता तलाठी भरती परीक्षेतही गैर प्रकार करणारा नागलोत ही याच जिल्ह्यातील आहे.