शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

जाब विचारणाऱ्यावर कोयत्याने हल्ला

By admin | Updated: February 8, 2015 00:56 IST

कामेरीत छेडछाड : महाविद्यालयीन युवतीही जखमी; हल्लेखोराला चोप

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास एका माथेफिरुने २३ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला चढविला, तर सोबतच्या युवकाच्या डाव्या पायावर वार करून त्याचा पाय मोडला. घटनेनंतर नागरिकांनी हल्लेखोर तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.जितेंद्र बापू सूर्यवंशी (रा. बुरुड गल्ली, इस्लामपूर) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात स्मिता अरुण पाटील (२३, रा. कामेरी) व नईम मुबारक नरदेकर (२१, रा. इस्लामपूर) हे जखमी झाले आहेत. दोघांवर इस्लामपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नईम नरदेकरच्या डाव्या पायाची नळी तुटली आहे, तर मुलीच्या उजव्या हातावर वार झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्मिता पाटील ही एम. बी. ए.ची विद्यार्थिनी आहे. मैत्रिणीचा लॅपटॉप वसतिगृहातील खोलीवर राहिल्याने तो देण्यासाठी ती दुचाकीवरून इस्लामपूरकडे येत होती. त्यावेळी जितेंद्र सूर्यवंशी दुचाकीवरून तिचा पाठलाग करू लागला. तिच्याकडे पाहून हसू आणि खुणावू लागला. त्याच्या या पाठलागामुळे घाबरलेल्या युवतीने आष्टा नाका परिसरातून गाडीचा वेग वाढवला व ती पुढे निघून आली. तिने दूरध्वनीवरुन नईम नरदेकर याला घटनेची माहिती दिली. पोलीस ठाण्याच्या परिसरात नईम थांबला होता. तेथे स्मिता पाटील आली. त्यापूर्वीच जितेंद्र सूर्यवंशी तेथे येऊन थांबला होता. ‘हा मुलगा माझा पाठलाग करीत होता’, असे स्मिताने नईमला सांगितले. त्यावर नईमने त्याला हटकत, ‘मुलीचा पाठलाग करतोस काय? चल पोलीस ठाण्यात’, असे म्हणताच जितेंद्र तेथून निघून गेला.त्यानंतर स्मिता व नईम हे वेगवेगळ्या दुचाकीने वसतिगृहात गेले. तेथील लॅपटॉप घेऊन तो मैत्रीण दीपालीला दिला व तेथून पुन्हा हे तिघे कामेरीला आले. त्यापूर्वीच जितेंद्र कामेरी येथील बसस्थानकावर कोयता घेऊन थांबला होता. स्मिताने तिच्या आईला, वसतिगृहावर जाते असे सांगितले व तिची मैत्रीण दीपाली आणि नईमसह पुन्हा इस्लामपूरकडे यायला निघाली. त्यावेळी बसस्थानकाजवळ थांबलेल्या जितेंद्र सूर्यवंशी याने नईमवर कोयत्याने हल्ला चढविला. यामध्ये त्याच्या डाव्या पायावर जबर वार बसले. स्मिताने हा हल्ला थोपविण्याचा प्रयत्न केल्यावर जितेंद्रने तिच्या उजव्या हातावर वार करून तिलाही जखमी केले. हा प्रकार बसस्थानकावरील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तेथे धाव घेत जितेंद्रला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. स्मिता पाटील हिने पोलिसांत फिर्याद दिली असून, जितेंद्रविरुद्ध विनयभंगासह गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद केला आहे. (वार्ताहर)