शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात मुख्याधिकाºयांच्या केबीनवर हल्ला : अनुपस्थितीमुळे संताप , दालनात तोडफोड; टेबल- खुर्चीवर पादत्राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:00 IST

आष्टा : आष्टा नगरपालिकेच्या इतिहासात शनिवारी पहिल्यांदाच नागरिकांनी पालिकेत अनुपस्थित मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यावरील संताप व्यक्त करीत त्यांच्या केबीनची मोडतोड केली. त्यांची खुर्ची टेबलवर ठेवून त्यावर पादत्राणे ठेवून अनोखा संताप व्यक्त केला. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्याकडे जत व आष्टा नगरपालिकांचीही जबाबदारी आहे. ते ...

आष्टा : आष्टा नगरपालिकेच्या इतिहासात शनिवारी पहिल्यांदाच नागरिकांनी पालिकेत अनुपस्थित मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यावरील संताप व्यक्त करीत त्यांच्या केबीनची मोडतोड केली. त्यांची खुर्ची टेबलवर ठेवून त्यावर पादत्राणे ठेवून अनोखा संताप व्यक्त केला. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्याकडे जत व आष्टा नगरपालिकांचीही जबाबदारी आहे. ते आष्टा पालिकेत वेळेवर येत नसल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबून राहत आहेत. निवेदन देण्यास आल्यास मुख्याधिकारी व नगराध्यक्ष पालिकेत अनुपस्थित असल्याने गैरसोय होत आहे. येथील पोळ गल्ली, मटण मार्केट येथील जुनी सार्वजनिक मुतारी काढल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.

तेथे पालिकेने तातडीने स्त्री व पुरुषांसाठी नवीन स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी आहे, याबाबतचे निवेदन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनुप वाडेकर, शंकर भोसले व सुजेंद्र पोळ शनिवार, दि. ६ रोजी सकाळी अकराच्या दरम्यान पालिकेत आले. त्यावेळी पालिकेत काही कर्मचारी आले होते. मुख्याधिकारी आहेत का?, असे त्यांना विचारले असता, मुख्याधिकारी नाहीत, असे उत्तर देण्यात आले. त्यांनी हजेरी रजिस्टर विचारले असता, ते देऊ शकत नाही, असे उत्तर कर्मचाºयांनी दिले. यावरून वादावादी झाल्यानंतर अनुप वाडेकर व शंकर भोसले मुख्याधिकाºयांच्या केबीमध्ये आले. त्यांनी मुख्याधिकारी नसल्याने संतप्त होऊन त्यांची खुर्ची टेबलवर ठेवून त्याशेजारी पादत्राणे ठेवली. केबीनमधील दूरध्वनी व संगणकाची मोडतोड केली. त्यानंतर मुख्याधिकारी नसल्याने पालिका कर्मचाºयांना निवेदन दिले.

दरम्यान, अनुप वाडेकर व शंकर भोसले यांनी शिवीगाळ करून मुख्याधिकारी केबीनची मोडतोड केल्याची फिर्याद पालिकेचे कर्मचारी इकबाल मुजावर यांनी आष्टा पोलिसात दिली आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील अधिक तपास करीत आहेत.काम बंद आंदोलननगपरिषदेच्या मुख्य इमारतीत शिरून जमावाने मुख्याधिकाºयांच्या दालनातच तोडफोड केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेची माहिती समजताच पालिकेचे सर्व कर्मचारी एकत्र आले. त्यांनी पालिकेसमोर ठिय्या मारून काम बंद आंदोलन केले व या प्रकरणातील हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली.आष्टा नगरपरिषदेत शनिवारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या दालनात जमावाकडून केबीनची मोडतोड करण्यात आली व टेबलवर पादत्राणे ठेवण्यात आली.