शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत १५ गावे संवेदनशील

By admin | Updated: February 20, 2017 23:58 IST

विशेष पोलिस बंदोबस्त : १४० केंद्रांवर आज मतदान, व्हीडीओ शुटिंग

आटपाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. संवेदनशील असणाऱ्या १५ गावांत विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर दिवसभर व्हिडीओ शुटिंग करण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती तहसीलदार अजितसिंह पाटील यांनी दिली.आटपाडी तालुक्यात जि. प. चे चार गट, तर पंचायत समितीचे आठ गण आहेत. एकूण १ लाख १७ हजार ३२६ मतदार आहेत. त्यापैकी निंबवडे पं. स. गणात १५४७०, दिघंची पं. स. गणात १३६२७, कौठुळी गणात १४७४१, आटपाडी गणात १३४९७, घरनिकी गणात १५०२२, खरसुंडी १४७९०, शेटफळे १५७४०, करगणी १४४३९ अशी मतदारांची संख्या आहे. एकूण १४० मतदान केंद्रांवर आज दुपारीच मतदान यंत्रासह ९२४ अधिकारी, कर्मचारी पोहोचले आहेत. प्रत्येक जि. प. गटासाठी २ आणि प्रत्येक पंचायत समिती गणासाठी २ राखीव मतदानयंत्रे ठेवली आहेत.प्रत्येक पं. स. गणासाठी २ अशा एकूण १६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. औरंगाबादचे पोलिस उपअधीक्षक ए. के. सराफ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, पोलिस निरीक्षक वैशाली पवार (औरंगाबाद) याच्यासह ५ पोलिस उपनिरीक्षक, ६६ पोलिस, ७२ महिला पोलिस, ३५ गृहरक्षक दलाचे जवान आणि दंगल नियंत्रण पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फिरती पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. (वार्ताहर)