शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यास अवकाळीचा तडाखा

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

कौठुळीत वीज कोसळून बैल ठार : पंचवीस लाखांचे नुकसान; दहा खोल्यांची चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त

आटपाडी : रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यात २५ लाखाहून अधिक नुकसान झाले. तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या कार्यालयावरच झाड पडले. तसेच कृष्णा पाटील यांची दहा खोल्यांची चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या चाळीतील भाडेकरूंचा संसार उद्ध्वस्त झाला, तर कौठुळी येथे वीज पडून एक बैल ठार झाला.तब्बल साडेचार महिन्यानंतर आटपाडी तालुक्यात आलेल्या पर्जन्यराजाने तालुकावासीयांना चांगलेच झोडपून काढले. आटपाडीत ४० मि.मी., दिघंचीच २० मि.मी., तर खरसुंडी येथे ७ मि.मी. नोंद झालेल्या या पावसाने नुकसान मात्र जादा केले.येथील धांडोर ओढ्याजवळील जय भवानीनगरमधील कृष्णा भाऊ पाटील यांची १० खोल्यांची पत्र्याची चाळ वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त केली. या दहापैकी नऊ खोल्यांत भाडेकरू राहतात. प्रत्येक कुटुंबाला दोन खोल्या आणि पुढे पत्र्याचा व्हरांडा होता. वादळी वाऱ्याने पत्रे लोखंडी अ‍ॅँगलसह उडून गेले. भिंतीलाही तडे गेले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. तहसीलदार अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.या घटनेत भाडेकरूंचे फ्रीज, टीव्ही यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. आनंदराव कृष्णा पाटील यांचे १ लाख १५ हजार, महादेव सखाराम कदम यांचे १ लाख, राजकुमार शिवराम क्षीरसागर यांचे ७५ हजार, नानासाहेब सर्जेराव कदम यांचे ६५ हजार, मुकेश अर्जुनलाल यादव यांचे ५० हजार, धनाजी कृष्णा मोरूळे यांचे ६० हजार, पतंगराव शंकरराव थोरात यांचे ६५ हजार, रुपाली अरुण देशमुख यांचे ६५ हजार, स्वप्नील अशोक दुधगावकर यांचे २५ हजार, तर जगदीश कमलाकर यांचे ३० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. दिघंची येथील मुरलीधर हरी मोरे यांच्या जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेले. सुदैवाने त्यावेळी जनावरे गोठ्यात नव्हती. गोठ्याचे खांब मोडून पडले. त्यामुळे त्यांचे १५ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख यांनी केला आहे.रात्री नऊ वाजता कौठुळी येथील अंबादास गोविंद कदम यांच्या बैलावर वीज पडल्याने हा बैल ठार झाला. त्यामुळे त्यांचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले आहे. हिवतड, गोमेवाडी, नेलकरंजी परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. (वार्ताहर)तहसील कार्यालय नव्या इमारतीत कधी?सध्या कामकाज होत असलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या मागे नवीन भव्य इमारत बांधण्यात आली आहे. तिथे मतमोजणीसह संगणकीकृत सात-बारा उतारे देण्याची सोय करण्यात आली आहे. पण या इमारतीच्या उद्घाटनाअभावी तहसीलदारांचे कार्यालय जुन्या इमारतीत आहे. काल रात्री तहसीलदारांच्या कक्षावर मागील बाजूने झाड पडले. त्यामुळे कौले, लाकडे फुटून कार्यालयाचे नुकसान झाले आहे.पाऊस कमी, नुकसानच जास्ततब्बल साडेचार महिन्यानंतर आटपाडी तालुक्यात आलेल्या पर्जन्यराजाने तालुकावासीयांना चांगलेच झोडपून काढले. आटपाडीत ४० मि.मी., दिघंचीच २० मि.मी., तर खरसुंडी येथे ७ मि.मी. नोंद झालेल्या या पावसाने नुकसान मात्र जादा केले.