शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत कोतवालास कोंडून वाळूचा डंपर पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

आटपाडी : वाळूतस्करावर कारवाई करून पकडून आणलेला वाळूचा ट्रक चोरट्यांनी राखणदार कोतवालास मारहाण करत खोलीत कोंडून पळवला. ही घटना ...

आटपाडी : वाळूतस्करावर कारवाई करून पकडून आणलेला वाळूचा ट्रक चोरट्यांनी राखणदार कोतवालास मारहाण करत खोलीत कोंडून पळवला. ही घटना आटपाडी तहसील कार्यालय आवारात घडली. याबाबत आटपाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आटपाडी तालुक्यातील अवैध वाळूतस्करांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. १४ सप्टेंबर रोजी विनानंबर प्लेट असलेला वाळू वाहतुकीचा ट्रक वाळूविरोधी पथकाने पकडून आणाला होता. तो आटपाडी तहसील कार्यालय शेजारी असणाऱ्या धान्य गोदाम परिसरात लावण्यात आला होता.

गुरुवार, दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोदामाच्या गेटचे कुलूप तोडत तोंडाला बुरखा बांधून आलेल्या तीन जणांनी आत प्रवेश केला. पहारा देत बसलेले संजय माने यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गोडावून रूममध्ये कोंडून ठेवत बाहेरून कडी लावली.

यावेळी चोरट्याने पांढऱ्या रंगाचा असणारा टेम्पोवजा डंपर वाळूसह पळवून नेला. यानंतर संजय माने यांनी आटपाडी पोलिसांशी संपर्क केला असता घटनास्थळी येऊन माने यांची पोलिसांनी सुटका केली. याबाबत संजय माने यांनी आटपाडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

चाैकट

एकाच महिन्यातील दुसरी घटना

वाळूविरोधी पथकाकडून जोखीम घेत वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून आणत ते तहसील कार्यालय परिसर व धान्य गोदाम परिसरात लावले जाते. पण, ही पकडून आणलेली वाहने चोरीस जाण्याची ही महिन्यातील दुसरी घटना आहे. वाळूसह वाहन चोरीला जाण्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चाैकट

महसूल विभागाचे अपयश की सहकार्य ?

दरम्यान, महसूल विभागाने कारवाई करत वाळूसह वाहनांचा पंचनामा केलेले वाहन महसूल विभागाच्या दारातूनच चोरून नेले जाते. हे महसूल विभागाचे अपयश आहे की महसूल विभागातील काहींच्या सहकार्यनेच या घटना घडल्या आहेत. याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा आहे.