शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीचा शिक्षण विभाग वादात

By admin | Updated: July 15, 2017 23:54 IST

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या : बदलीसाठी ‘दर’?, शिक्षकांची पंचाईत

अविनाश बाड।  लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांमुळे आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बदली झालेल्या २० शिक्षकांना सोडले, मात्र आणखी ४९ शिक्षकांना न सोडल्याने ५ ते १० हजार रुपये असा प्रत्येक शिक्षकामागे बदलीचा दर सुरू झाला आहे, अशी चर्चा पंचायत समितीच्या आवारात शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे.दि. ५ जुलै रोजी आंतरजिल्हा बदलीचे आदेश जिल्हा परिषदेतून देण्यात आले. या आदेशामुळे आप-आपल्या जिल्ह्यात किंवा सोयीच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी इच्छुक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आटपाडी पंचायत समितीमधून शिक्षकांना सोडण्यास नकार दिल्याने शिक्षकांची मोठी पंचाईत झाली आहे. लवकर तिथे हजर झाले नाही, तर तिथे हवी ती शाळा मिळण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल, असे काहींनी सांगितले. बदलीचा आदेश झालेले शिक्षक-शिक्षिका शाळेत न जाता थेट पंचायत समितीच्या कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. त्यात आता शिक्षक संघटना आणि त्यांचे नेते आघाडीवर आहेत.आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १९० शाळा आहेत. ४७५ शिक्षक कार्यरत आहेत. या बदल्यांपूर्वी एकूण ४९ मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ३७ उपशिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. आता बदलून गेलेले आणि जाणारे अशी एकूण ८६ उपशिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या सिध्दनाथनगर (गोमेवाडी), घनचक्रीमळा (दिघंची) आणि काळामळा (राजेवाडी) या तीन प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. तालुक्यात बाहेरुन इथे येण्यास शिक्षक इच्छुक नसतात. त्यामुळे जि. प. च्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.शनिवारी दिवसभर पंचायत समितीच्या आवारात बदली झालेली शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. बदली झालेल्या शिक्षिका मात्र रडकुंडीस आल्या होत्या.अशा परिस्थितीत सध्या अहमदनगर जिल्ह्यासाठी-१०, सोलापूर-२, बीड-१, नाशिक-१, नांदेड-१, वाशिम-१, उस्मानाबाद-४ आणि सातारा जिल्ह्यातील ४ शिक्षकांना सोडले आहे. त्यामुळे रिक्त पदांच्या ठिकाणी शिक्षक आले नाहीत, तर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार, ही वस्तुस्थिती आहे.पुरव्याशिवाय खोटे आरोप : मोरे याबाबत आटपाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे म्हणाले की, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने सोडायचे, हा सभागृहाचा निर्णय आहे. त्यानुसार रितसर प्रक्रिया सुरु आहे. माझ्या कार्यालयाकडून कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. पुराव्याशिवाय खोटे आरोप करणाऱ्यांना काय म्हणणार?