शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाका-पडळकर गटात आटपाडीत मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:19 IST

आटपाडी : खासदार संजयकाका पाटील आणि युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी तब्बल तीनवेळा मारामारी झाली. पोलिसांनी दोनवेळा लाठीचार्ज करून जमाव पांगवला. दोन्ही गटातील ५० जणांविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आटपाडीत जादा पोलीस बंदोबस्त मागविला आहे.बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यल्लाप्पा हणमंत ...

आटपाडी : खासदार संजयकाका पाटील आणि युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी तब्बल तीनवेळा मारामारी झाली. पोलिसांनी दोनवेळा लाठीचार्ज करून जमाव पांगवला. दोन्ही गटातील ५० जणांविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आटपाडीत जादा पोलीस बंदोबस्त मागविला आहे.बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यल्लाप्पा हणमंत पवार (वय २६, रा. मापटेमळा, आटपाडी) याने गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केल्याने, राजू नाना जानकर (२५, रा. भेंडवडे, ता. खानापूर) या दोघांत मारामारी झाली. राजू जानकर हे गोपीचंद पडळकरांचे समर्थक आहेत. त्यानंतर खासदार पाटील समर्थकांनी बिरुदेव खांडेकर यांना मारहाण केली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आबानगर चौकात पडळकर समर्थक गोळा झाले. तेव्हा पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. त्यानंतर साठेनगर चौकात दोन गटात पुन्हा मारामारी झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला.याप्रकरणी दोन्ही गटाकडून फिर्याद देण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांनी हवालदार राम खाडे आणि पोलीस नाईक संतोष गोविंद बेबंडे यांनी दोन्ही गटाविरुध्द फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनिल महादेव सूर्यवंशी (रा. गोंदिरा), राजू नानासाहेब जानकर (रा. भेंडवडे, ता. खानापूर), बंडुपंत आबा धडस (रा. उंबरगाव), काशिनाथ सोन्याबापू शेंडगे (रा. बोंबेवाडी), बिरुदेव लक्ष्मण खांडेकर (रा. नांगरेमळा), योगेश मोहन मारकड (रा. भानुसेमळा, आटपाडी), ईश्वर अण्णा मेटकरी (रा. गोंदिरा), विक्रम देवडकर (रा. निंबवडे), गणेश पुजारी (रा. पुजारवाडी), काशिनाथ जेडगे (रा. बोंबेवाडी), अजित नाथाजी जाधव, यल्लाप्पा हणमंत पवार, अनिल जाधव, अविनाश चव्हाण, प्रवीण मंडले, लक्ष्मण शिवाजी जाधव, प्रशांत जाधव, सूरज जाधव (सर्व रा. आटपाडी) यांच्यासह ५० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साठेनगर चौकात रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील कार्यकर्ते गटा-गटाने थांबले होते. पोलीसही मोठ्या संख्येने उपस्थित होते.पडळकरांवरील : टीकेने वाद पेटलागोपीचंद पडळकरांनी खासदार पाटील यांच्यावर टीका करून भाजपला रामराम केला आहे. आता ते पक्षात नाहीत. हा धागा पकडून सकाळी यल्लाप्पा पवार याने पडळकरांवर त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोचरी टीका केली. त्यामुळे दोन गटात संघर्षाची ठिणगी पडली. दिवसभर काठ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या घेऊन पोलिसांना चौकात थांबावे लागले.