शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत एका दगडात अनेक पक्षी घायाळ

By admin | Updated: August 11, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणुकीचे वेध : तिरंगी लढतीत बंडखोरीच्या घोषणेने रंगत; मतदारसंघात चर्चा

अविनाश बाड --आटपाडी -- आटपाडीत नुकत्याच झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून यावेळी बंडखोरीची घोषणा केली. गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी आमदार अनिल बाबर यांच्यावर केलेल्या जोरदार टीकेचा सध्या वेगवेगळा अर्थ लावला जात आहे. त्यामुळे देशमुख यांनी एका दगडात अनेक पक्षी घायाळ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.शनिवारी येथे खरे तर कृष्णा नदीतून आटपाडी तालुक्याच्या ५३ गावांच्या पाणी योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, पण हा कार्यक्रम योजनेऐवजी विधानसभेच्या निवडणुकीवरच जास्त रंगला. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमोर अमरसिंह देशमुख यांनी, आबा, तुम्ही आम्हाला तिकीट देणार नाही हे माहीत आहे, पण आता आम्ही थांबणार नाही. निवडणूक लढविणारच, असे जाहीर करून, राष्ट्रवादीच्या नेत्यांचेही यावेळी ऐकणार नसल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही देशमुख यांची भेट झाल्याचे वृत्त आहे.गृहमंत्री पाटील यांनीही, माझ्यामुळे मागील दोन विधानसभेच्या निवडणुका आटपाडीकरांना थांबावे लागल्याचे मान्य केले. पाटील आणि माजी आमदार अनिल बाबर यांचे बंधुप्रेम सर्वज्ञात आहे. त्यामुळेच आबांनी बाबर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर केलेली टीका बाबर गटाला झोंबणारी ठरली आहे.विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याऐवजी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना मदत केल्याचा आरोप आबांनी केल्यानंतर आबांची लोकसभेची जखम अजून ताजी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विसापूर गटातून आबांची मदत कोणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आटपाडी आणि विट्यातील तीन प्रस्थापित नेते प्रथमच एकमेकांसमोर शड्डू ठोकणार आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकीत आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख, विट्यातून सदाशिवराव पाटील आणि बाबर या तिघांनी प्रत्येकवेळी दोघे एका बाजूला आणि एकजण दुसऱ्या बाजूला अशाच पध्दतीने विधानसभा निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे या नेत्यांना कोण किती पाण्यात आहे हे प्रथमच कळणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत, पण राष्ट्रवादीचे किती गट कुठल्या नेत्याला पाठिंबा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.