शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

वारणावती परिसरात बिबट्याच्या सततच्या दर्शनाने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:20 IST

वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणावती परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. ...

वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणावती परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. वारणावतीनजीकच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पात पन्नासहून अधिक बिबट्यांचे अस्तित्व आहे. प्रकल्पाला कुंपण नसल्यामुळे अन्नाच्या शोधात बिबटे प्रकल्पाबाहेर येऊ लागले आहेत.काही दिवसांपूर्वी प्रकल्पापासून चाळीस किलोमीटरवर असणाऱ्या कापरी तसेच वाळवा तालुक्यातील गोटखिंडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. गतवर्षी पणुंब्रेजवळ दोन बिबटे मृतावस्थेत सापडले होते. यावरून सह्याद्री प्रकल्पातील बिबटे प्रकल्पाबाहेर विहार करत असल्याचे सिद्ध झाले होते. गेल्या दोन वर्षांत या बिबट्यांनी परिसरातील शेतकºयांच्या शेळ्या, गाई, मेंढ्यांवर हल्ले करून त्यांना ठार केल्याच्या घटना वाढल्या आहेत. वाड्या-वस्त्यावर दिसणारे हे बिबटे आता चक्क मानवी वस्तीत दिसू लागल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी वारणावतीत करमणूक केंद्राजवळ सुभाष कांबळे यांना रात्रीच्यावेळी चक्क रस्त्यावर बिबट्या दिसला, तर चांदोलीला आलेल्या काही पर्यटकांना सोनवडे शाळेजवळ हुतात्मा नानकसिंग विद्यालयाजवळील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले, तर मणदूर येथील राजेंद्र कांबळे यांच्या मालकीची दोन पाळीव कुत्री बिबट्याने पळवून नेली.