शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत रंगला युवक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:52 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : बहारदार सादरीकरण, तरुणाईचा उत्साह आणि विविध कलाप्रकारातील उत्स्फूर्त सहभागाने जिल्हाभरातून आलेल्या ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : बहारदार सादरीकरण, तरुणाईचा उत्साह आणि विविध कलाप्रकारातील उत्स्फूर्त सहभागाने जिल्हाभरातून आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी युवक महोत्सव गाजविला. सोमवारी आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवक महोत्सव उत्साही वातावरणात पार पडला. भारतीय संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले. तेराशेवर विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे महोत्सवाची रंगत वाढली. रात्री उशिरापर्यंत विविध कलाप्रकारांचे सादरीकरण सुरू होते.शिवाजी विद्यापीठांतर्गत ३८ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव आटपाडीत झाला. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाने संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा समन्वयक संपत पार्लेकर, एम. एल. होनगेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. विजय लोंढे, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष प्रा. डी. डी. जाधव यांची उपस्थिती होती.सकाळपासूनच जिल्हाभरातील ४३ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे आटपाडीत आगमन सुरू होते. उद्घाटनानंतर मुख्य स्पर्धां सुरु झाली. एकूण सात रंगमंचांची सोय केली होती. १४ कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी कला सादर केली. लोकनृत्य, लोकसंगीत, गायन, एकांकिकांतून विद्यार्थ्यांनी आटपाडीकरांना सांस्कृतिक मेजवानीच दिली. ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या नावच्या मुख्य रंगमंचावर लोकनृत्य व लोककला सादर करण्यात आल्या. पथनाट्यातून सामाजिक संदेश देत विद्यार्थ्यांनी समाजाप्रतीची बांधिलकी दृढ केली. विविध कलाप्रकारांचे सादरीकरण रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने व त्यानंतर निकाल जाहीर होणार असल्याने निकालाबाबत उत्सुकता लागली होती.