शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा होणार पहिले झोपडपट्टीमुक्त शहर

By admin | Updated: December 8, 2015 00:45 IST

शेखर गायकवाड : नगरपालिकेचा शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात

आष्टा : आष्टा नगरपरिषदेने केंद्राच्या व राज्याच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. येत्या काळात आष्टा हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर होईल. शहरातील सर्व गोरगरिबांना घरकुले देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी रविवारी केले.आष्टा नगरपरिषदेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्धापनदिन सांगता समारंभाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, लीलाताई जाधव, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, पं. स. उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, वैभव शिंदे, विशाल शिंदे, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, ‘पीपल्स’चे अध्यक्ष दिलीप वग्याणी, विराज शिंदे, मोहनराव शिंदे, संग्राम फडतरे, झुंझारराव पाटील, झिनत आत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, गरिबांना घरे देण्यासाठी सध्या विविध ठिकाणी बहुमजली इमारतीच्या वर आणखी एक ते दोन मजले उभारण्यात येतील. आष्टा शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात येतील. ३१ डिसेंबरअखेर आष्टा १00 टक्के शौचालययुक्त शहर होणार आहे. पालिकेने सेंद्रीय खत प्रकल्प राबवित देशात आदर्शवत कामगिरी केली आहे.विलासराव शिंदे म्हणाले, आष्टा शहर हे शेतीप्रधान आहे. याठिकाणी औद्योगिक विकास झाला नाही. पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित शहराचा विकास केला आहे. स्वागत कमानी, प्रमुख रस्ते, चौक यांना नावे देऊन, चौक सुशोभिकरणातून शहरातील गुणवंतांच्या त्यागाचा गौरव केला आहे.नगराध्यक्षा सौ. शिंदे म्हणाल्या, पालिकेच्या विकास कामांना शासनाने सहकार्य केले आहे. मर्दवाडी येथील महादेव मंदिराचा जीर्णोध्दार व्हावा, घरकुलांच्या अपूर्ण कामास निधी मिळावा, पालिकेला पाण्याचे वीज बिल शेतीप्रमाणे कमी दरात आकारण्यात यावे.वर्धापन दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या वारसांचा, आजी व माजी कर्मचारी, उत्कृष्ट गणेश मंडळ, स्मशानभूमी सुशोभित करणाऱ्या शिवनेरी, एकवीरा संस्थांसह हुतात्मा स्मारक बगीचा विकसित करणाऱ्या इंजिनिअर असोसिएशनचा, विविध सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय मोरे, प्रकाश मिरजकर, नितीन झंवर, नंदकुमार बसुगडे, तानाजी सूर्यवंशी, शैलेश सावंत, प्रकाश रुकडे, समीर गायकवाड, प्रणव चौगुले, मयूर धनवडे, बाळासाहेब वाडकर, जोतिराम भंडारे, नियाजूल नायकवडी, दादा शेळके, शेरनवाब देवळे, चंद्रकांत पाटील, उदय कुशिरे, प्रभाकर जाधव, सतीश माळी, अभिजित वग्याणी, के. टी. वग्याणी, बबन थोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)जागांची खरेदी-विक्री : महिन्यात प्रश्न सुटेलआष्टा येथील दत्त वसाहत, गांधीनगरातील गट क्र. ४, ६ व ९ येथील जागांचे खरेदी-वक्रीचे व्यवहार बंद असल्याने मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, नगरसेवक मुकुंद इंगळे, दिगंबर पन्हाळकर यांनी वारंवार प्रयत्न केले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी महिन्याभरात येथील जागेचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.शहराचा विकास झालाआष्टा शहर हे शेतीप्रधान आहे. यामुळे याठिकाणी औद्योगिक विकास झाला नाही. पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित शहराचा विकास केला आहे. स्वागत कमानी, प्रमुख रस्ते आदी विकास कामाच्या माध्यमातून शहराचा विकास केला आहे, असे मत माजी आमदार विलासराव शिंदे यांनी व्यक्त केले.