शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:36 IST

जत : फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून त्यापैकी वीस हजार रुपये घेताना जत ...

जत : फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून त्यापैकी वीस हजार रुपये घेताना जत पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गजानन वसंत कांबळे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई पोलीस ठाण्यातच करण्यात आली.शेतात सौर ऊर्जा यंत्रणा बसवून देतो, तसेच शासनाचे अनुदान मिळवून देतो, असे खोटे सांगून एका भामट्याने तालुक्यातील कोसारी व बनाळी येथील चार शेतकºयांची सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक करून पलायन केले होते. यासंदर्भात शेतकºयांनी जत न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने फरारी भामट्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल केला होता. याचा तपास सहायक निरीक्षक गजानन कांबळे याच्याकडे होता. त्याने या शेतकºयांना बोलावून घेऊन फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याच्या बदल्यात दोन लाखाची मागणी केली. संबंधित शेतकरी तयार झाल्यानंतर त्यापैकी पन्नास हजार रुपये प्रथम व उर्वरित दीड लाख रुपये नंतर द्या, असे कांबळेने सांगितले. ठरलेल्या पन्नास हजारांपैकी वीस हजार रुपये घेऊन शेतकरी मंगळवारी जत पोलीस ठाण्यात आला होता. दुपारच्या जेवणाच्या सुटीत पोलीस ठाण्यातील गर्दी कमी झाल्यानंतर शेतकºयाने वीस हजार रुपये कांबळे याला दिले. तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी कांबळे याला ताब्यात घेतले. यावेळी आपल्याला जबरदस्तीने पैसे दिल्याचे सांगून, आपण लाच घेतलीच नाही, असा बनाव करण्याचा प्रयत्न कांबळेने केला, परंतु ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या अधिकाºयांनी तो प्रयत्न उधळून लावत त्याला अटक केली..जत पोलीस ठाण्यातील चौथी कारवाईजत पोलीस ठाण्यात यापूर्वी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सीमा आघाव-बढे, सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. शेख, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे व मंगळवारी गजानन कांबळे याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे.अपहाराची चर्चासहायक निरीक्षक गजानन कांबळे हा २००९ च्या बॅचचा अधिकारी आहे. २० ते २५ आॅक्टोबर या दरम्यान जत येथे रात्रपाळीसाठी असताना त्याने मोठ्या रकमेचा अपहार केल्याची चर्चा आहे; परंतु याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाºयांनी चौकशी केली. मात्र, कांबळेवर कारवाईस टाळाटाळ होत असल्याचे बोलले जाते.