पेठ : रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानून उपचाराअंति घरी असलेल्या पेठ पंचक्रोशीतील गरजू, होतकरू, गरीब रुग्णांना वैद्यकीय साधनांची उपलब्धता करून देण्याचा स्तुत्य उपक्रम पाटील कुटुंबीयांकडून करण्यात आला, असे प्रतिपादन युवक नेते प्रतीक पाटील केले.
पेठ (ता. वाळवा) येथील कै. संभाजीराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पाटील कुटुंबीयांनी गावातील परिस्थितीअभावी ज्या रुग्णांना घरगुती वैद्यकीय साधनांची उपलब्धता होत नसेल अशा गरजू रुग्णांना कमोड चेअर, वाकिंग स्टिक, पाण्याची गादी, हवेची गादी, लघवीचे भांडे, फोवलर बेड, वॉकर, होम व्हिजिट, इंजेक्शन देणे आदी सुविधा मोफत दिली. त्याचे वाटप प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजारामबापू बॅँकचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, संग्राम पाटील, विजय पाटील, सयाजीराव पाटील, जयंत संभाजीराव पाटील, अतुल पाटील, माणिक देशमाने, संतोष देशमाने, संदीप पाटील, ज्ञानेश्वर पेठकर, डॉ. मानसिक पाटील, उदय पाटील, भागवत पाटील, हणमंतराव कदम उपस्थित होते.