शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये परप्रांतीय तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST

कुपवाड : शहरातील जोगेंद्र शामदेव पासवान (सध्या रा. गल्ली नं. एक उमेदनगर, कुपवाड, मूळगाव झारखंड) या तरुणावर गुरुवारी रात्री ...

कुपवाड : शहरातील जोगेंद्र शामदेव पासवान (सध्या रा. गल्ली नं. एक उमेदनगर, कुपवाड, मूळगाव झारखंड) या तरुणावर गुरुवारी रात्री दारूच्या नशेत एका तरुणाने कटरने प्राणघातक हल्ला केला. पासवान याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

अभिषेक मदन गुरव (वय २१, उमेदनगर, भारत सूतगिरणीजवळ, कुपवाड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. जखमी पासवान व त्याचा मित्र उमेदनगर येथे गुरुवारी रात्री जेवण करीत बसले होते. यावेळी संशयित अभिषेक गुरव हा दारूच्या नशेत त्यांच्याजवळ येऊन बडबडत असताना पासवान याने त्यास घरी जाण्यास सांगितले. मला घरी जाण्यास का सांगितलस असे म्हणून त्याने आपल्या जवळच्या कटरने त्याच्या छातीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर संशयित फरार झाला. जखमीला त्याच्या मित्रांनी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी पासवान याने संशयित गुरव याच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.