शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विश्रामबागच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

सांगली : विश्रामबाग परिसरातील सावकर प्रतिष्ठाननजिकचा खुल्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्यास सर्वपक्षीय कृती समितीने विरोध केला आहे. या आरक्षणाबाबत ...

सांगली : विश्रामबाग परिसरातील सावकर प्रतिष्ठाननजिकचा खुल्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्यास सर्वपक्षीय कृती समितीने विरोध केला आहे. या आरक्षणाबाबत फेरसुनावणी घेऊन सर्वेक्षण करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. शासनाने आरक्षण रद्दचा निर्णय घेतल्यास कायदेशीर लढा देण्याचा इशाराही दिला आहे.

सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर, माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, प्रशांत भोसले, महेश खराडे, शंभुराज काटकर, विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, असिफ बावा, उमेश देशमुख, ज्योती आदाटे, वि. द. बर्वे, शंकर पुजारी, ॲड. प्रियांका तूपलोंढे आदींच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभागालाही पाठविण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्व्हे नंबर ३६३/२ मधील ६६०० चौरस मीटर जमिनीवर माध्यमिक शाळेचे आरक्षण आहे. ते उठवून या जागेचा रहिवासी क्षेत्रात समावेश करण्याबाबत शासनाने निर्णय दिला आहे. महापालिका आयुक्तांनी अधिसूचना काढून सूचना व हरकती मागवल्या आहेत. याबाबत समितीने काही सूचना व हरकती कळवल्या आहेत. त्यावर विचार करून शासनाने होणारे नुकसान टाळावे.

हा भूखंड हा विस्तारित क्षेत्राच्या मध्यभागी असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधांसाठी सार्वजनिक आणि निम सार्वजनिक क्षेत्रात कायम आरक्षित ठेवावा, हा प्रस्ताव महासभेसमोर ठेवून त्यांच्या मान्यतेने अंतिम निर्णय घेण्यात यावा. त्याचबरोबर या जमिनीच्या मालकीबाबत फेरसुनावणी घेऊन मिळकत शासन मालकीमध्ये येते का खासगीमध्ये, याबाबत फेर सर्व्हेक्षण करावे. महापालिकेत योग्य ठराव झाल्याशिवाय आरक्षण उठवण्यात येऊ नये, अशी मागणीही केली आहे.

शासनाने मनमानी कारभार करून आरक्षण उठवून झोन बदलल्याने होणाऱ्या नुकसानीस संबंधित अधिकारी जबाबदार असतील. हा भूखंड नागरी सुविधांसाठी वाचविण्यास योग्य कारवाई शासन स्तरावर न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असाही इशारा देण्यात आला आहे.