फोटो ओळ : आष्टा पीपल्स बँकेच्या सभेत अध्यक्ष बबन थोटे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी दिलीपराव वग्यानी, जयदीप थोटे, कौशिक वग्यानी, अनिल पाटील, विराज शिंदे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील दि आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला मार्च २०२१ अखेर ३ कोटी १० लाख निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या सभासदांना १३ टक्के लाभांश देण्यात येत आहे, अशी माहिती अध्यक्ष बबन थोटे यांनी ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, जयदीप थोटे, कौशिक वग्यानी, अनिल पाटील, विराज शिंदे, दादासाहेब कोरुचे, फंचू हालुंडे, सुनील वाडकर, अनिल मडके, पुरणकुमार माळी, रामचंद्र सिद्ध, विष्णू वारे, उषाराणी आवटी, उषा कवठेकर, विनोद पाटील, अनिल चौगुले, सुरेश चौगुले, सुरेश कबाडे, प्रीती पाचोरे प्रमुख उपस्थित होते.
बबन थोटे म्हणाले की, मार्च २०२१ अखेर बँकेच्या ठेवी ३३४ कोटी, कर्ज वाटप १९७ कोटी, भागभांडवल १२ कोटी, स्व: निधी ४७ कोटी, खेळते भांडवल ३९६ कोटी आहे.
अध्यक्ष बबन थोटे यांनी अहवाल वाचन केले, तर ताळेबंद, नफा-तोटा पत्रक वाचन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मासाळ यांनी केले. रमेश इंगळे, प्रीती मगदूम, शांतीसागर चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाषचंद्र झंवर, रघुनाथ जाधव, सचिन चौगुले, श्रीकांत शहा, नितीन झंवर, महावीर थोटे, कुलभूषण आवटी, जयपाल मगदूम, राजाराम हाके, डॉ. अनिल निर्मळे, दीपक मेथे, शिवाजी ढोले आदी उपस्थित होते.