शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा बस स्थानकाचा लोकवर्गणीतून कायापालट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

आष्टा : आष्टा बसस्थानकातील शौचालयाचा तसेच परिसराचा लोकवर्गणीतून कायापालट करण्यात येणार आहे. बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्था व इतर सहकारी ...

आष्टा : आष्टा बसस्थानकातील शौचालयाचा तसेच परिसराचा लोकवर्गणीतून कायापालट करण्यात येणार आहे. बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्था व इतर सहकारी संस्थांनी या कामाला नूतन वर्षाच्या मुहूर्तावर सुरुवात केली.

शौचालयाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन राज्य परिवहन मंडळाच्या सांगली विभागाचे विभागीय अभियंता श्रीकांत सूर्यवंशी, अभियंता अरुण वाघारे, इस्लामपूर आगाराच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा घोलप-पाटील यांच्या हस्ते झाले.

सांगली-पेठ मार्गावरील आष्टा बसस्थानक परिसरातील प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आष्टा-कोल्हापूर, तासगाव, आष्टा-सांगली ,आष्टा-मुंबई या मार्गावर जाणाऱ्या सर्व एस.टी. बसेस आष्टा बस स्थानकात येतात. मात्र, या बसस्थानकातील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेसह विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे तसेच बसस्थानक परिसरात झाडे लावून बगीचा तयार करण्यात येणार आहे.

यावेळी कनिष्ठ अभियंता विजय रुपनर, लालासाहेब देसाई ,वाहतूक नियंत्रक कुमार माळी, शंकरराव कदम, संग्राम शिंदे, बाबासाहेब भोपे, अशोक मदने, शहाजान जमादार, वसंत कांबळे, महादेव झांबरे, सेवानिवृत्त एस. टी. कर्मचारी संघटनेचे अब्बास लतीफ, सिराज मुजावर मारुती सावंतसह मान्यवर उपस्थित होते.

कोट

आष्टा बसस्थानक परिसरात पुरुष व महिला स्वच्छतागृह आहे. मात्र, या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सामाजिक जबाबदारी समजून बसस्थानक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण व बगीच्याचे काम हाती घेतले असून या कामाला सर्वांनी मदत करावी.

- संग्राम शिंदे, अध्यक्ष, बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्था

फोटो-०१आष्टा१

फोटो ओळ : आष्टा बसस्थानक सुशोभीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी सांगली विभागाचे विभागीय अभियंता श्रीकांत सूर्यवंशी, अभियंता अरुण वाघाटे, इस्लामपूर आगाराच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा घोलप-पाटील आदी उपस्थित होते.