शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अशोकराव गायकवाड भाजपच्या संपर्कात

By admin | Updated: September 1, 2014 23:09 IST

विट्यात काँग्रेसलाही खिंडार : ९ सप्टेंबरला प्रवेशाची शक्यता

दिलीप मोहिते - विटा -खानापूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर आता येथील विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड हेही कॉँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला गायकवाड समर्थक कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात दुजोरा दिला आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघात आता राष्ट्रवादीपाठोपाठ कॉँग्रेसलाही खिंडार पडण्याची शक्यता आहे. येत्या ९ सप्टेंबरला भाजपच्या प्रदेश नेतेमंडळींच्या उपस्थितीत गायकवाड कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.विटा नगरपरिषदेवर गेल्या तीन पिढ्यांपासून वर्चस्व ठेवणारे कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक म्हणून विकास आघाडीचे नेते गायकवाड यांची जिल्ह्याला ओळख आहे. परंतु, २०११ च्या पालिका निवडणुकीत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या मध्यस्थीतून आ. पाटील व गायकवाड यांची ‘ऐक्य एक्स्प्रेस’ रूळावर आली. मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून ही ऐक्य एक्स्प्रेस घसरू लागली आहे. विकास आघाडी समर्थक कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे गायकवाड यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाब वाढू लागला. त्यामुळे आता या ऐक्य एक्स्प्रेसने कायमचाच ‘थांबा’ घेतला आहे.राष्ट्रवादीपाठोपाठ आता गायकवाड यांच्या रूपाने कॉँग्रेसचा मोहराही महायुतीच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉँग्रेसवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील काँग्रेस पक्षाला हा जबर हादरा मानला जाणार आहे.