शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांच्या आंदाेलनाने काेराेना सर्वेक्षणास खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

लाेकमत न्युज नेटवर्क कडेगाव : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू ...

लाेकमत न्युज नेटवर्क

कडेगाव : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. यामुळे संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोरोना सर्वेक्षणाला खीळ बसली आहे. आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याचे चित्र कडेगाव तालुक्यात दिसत

आहे.

महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेला संप मागण्यांची पूर्तता होईपर्यंत चालूच ठेवणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या संपामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामालाच खीळ बसली आहे. कोरोना

चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहेत.

गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पल्स आणि ऑक्सिजन

तपासणीसाठी आरोग्य विभागाची कर्मचारी संख्याच अपुरी पडत आहे. कोरोनाची

लढाई जिंकण्यासाठी सर्वतोपरी

प्रयत्नशील असलेल्या आरोग्य

विभागाला आरोग्य सेवेचा कणा असलेल्या

आशा स्वयंसेविकांची मदत मिळेनाशी झाली आहे.

कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्यावा, माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्यावा, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीचे पत्र द्यावे, आशा व गटप्रवर्तकांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करावी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेने अशा मागण्या

केलेल्या आहेत. मात्र राज्य शासनाने

याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

यामुळे आशा स्वयंसेविकांचा बेमुदत

संप सुरूच आहे. याचा परिणाम कोरोना नियंत्रण मोहिमेवर होत आहे.

चौकट :

माघार नाही, सांगलीला जाणार

सोमवारी आम्ही सांगलीला जाणार आहोत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर निदर्शने करणार

आहोत. आम्ही जसे कोरोनाविरुद्ध

रणरागिणीसारखे लढलो तसे आता

हक्कासाठी लढणार आहोत. आता माघार नाही. असे कडेगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी सांगितले.