शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

सांगली जिल्ह्यात तब्बल २८८ ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात

By अशोक डोंबाळे | Updated: September 22, 2024 14:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तहसीलदारांना चौकशीचे आदेश : नोटिसा देऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादरच नाही

अशोक डोंबाळे/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : निवडणूक झाल्यानंतरदेखील जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकणाऱ्या २८८ ग्रामपंचायत सदस्यांना पद रद्द का करू नये, अशी नोटीस संबंधितांना दिली आहे. यात तासगाव तालुक्यातील सर्वाधिक ९७ सदस्यांचा समावेश आहे. जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना अनेक वेळा देऊनदेखील याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना सदस्यांचे जातवैधता प्रमाणपत्राचा तातडीने अहवाल देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात २०२१ मध्ये १५२ ग्रामपंचायतींमधील एक हजार ५०७ सदस्यपदासाठी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यामध्ये ५५२ सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले होते. त्यापैकी प्रशासनाच्या नोटिसीनंतर २६४ सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले होते. पण, २८८ सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्रच सादर केले नव्हते. याप्रकरणी संबंधित सदस्य व सरपंच यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. म्हणून जिल्ह्यातील २८८ ग्रामपंचायत सदस्यांना सदस्यत्व रद्द का करू नये, अशी अंतिम नोटीस जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.चौकटग्रामपंचायत सदस्यांची संख्यातालुका संख्याजत            ७५पलूस ३१खानापूर २६आटपाडी ०४मिरज ३४तासगाव ९७क.महांकाळ १०कडेगाव १०वाळवा ०१एकूण २८८

चौकटसदस्यत्व रद्दची होणार कारवाई-राखीव जागेवर उमेदवारी अर्ज भरून जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांची यादी जातवैधता समितीकडून जिल्हा प्रशासनाला सादर केली होती.- जिल्हा प्रशासनाने एक आदेश काढून जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या २८८ सरपंच अथवा सदस्यांची पदे रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याची तयारीजिल्ह्यातील चक्क २८८ सदस्यांचे जातवैधता प्रमाणपत्र तीन वर्षांत सादर केले नाही. यामुळे या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास अनेक ग्रामपंचायती अल्प मतात येण्याची शक्यता आहे. यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची तयारी प्रशासनाकडून होऊ शकते. जिल्ह्यातील आरक्षित जागेवर विजय झालेल्या सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र घेण्याची सूचना दिली होती. तरीही त्यांनी वेळेत दाखल केले नाही. तसेच काहींचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. म्हणून जिल्ह्यातील २८८ ग्रामपंचायत सदस्यांचा सुधारित अहवाल देण्याची सूचना तहसीलदारांना दिली आहे.-राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत