कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे शिवशंभूशाहीर प्रा. अरुण घोडके यांची महाराष्ट्र प्रदेश महासंघ सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संग्राम जगदीश पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.
सत्काराला उत्तर देताना घोडके यांनी संघर्षमय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, जगदीश पाटील यांचे मला नेहमी मोठे पाठबळ मिळाले. आपले मित्र, कार्यकर्ते कसे मोठे होतील यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. यावेळी धनाजी पाटील, सूर्याजी पाटील, शरद पाटील, बादशहा नदाफ, आनंदराव पवार, राजाराम जाधव, दीपक चव्हाण, जालिंदर पाटील, विनायक मुळीक, अशोक पाटील उपस्थित होते. किरण खोत यांनी स्वागत केले. इंद्रजित पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ०३ कामेरी १
ओळी : कामेरी येथे प्रा. अरुण घोडके यांचा सत्कार संग्राम पाटील, इंद्रजित पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.