कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील शहा - लुल्ला नगरमध्ये देशी, विदेशी दारूची विक्री करीत असताना एका तरुणास कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्याजवळील २७ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे.
मारुती आबासोा गडदे (वय ३५, रा. हमालवाडी, वाघमोडेनगर कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी एक इसम सावळीतील शहा - लुल्ला नगरमध्ये देशी, विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल, सहायक पोलीस फौजदार युवराज पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी संशयित मारुती गडदे हा दारूची विक्री करीत असताना रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याच्याजवळील २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली आहे.