शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराओ

By admin | Updated: August 13, 2014 23:31 IST

देविखिंडीत आंदोलन : आंदोलक शेतकऱ्यांना अटक व सुटका

विटा : खानापूर पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेच्या टप्पा क्र. ४ व ५ साठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामे तातडीने पूर्ण करावीत यासह टेंभूच्या पाण्यासाठी आज बुधवारी देविखिंडी (ता. खानापूर) येथे संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. तत्पूर्वी टेंभूच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी पाणी अडविण्यासाठी कालव्याकडे धाव घेतली. त्यावेळी भक्तराज ठिगळे यांच्यासह दहा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पाणी अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.खानापूर तालुक्याच्या पूर्व भागाला टेंभूचे पाणी देण्यासाठी टप्पा क्र. ४ व ५ चा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, या कामांना निधीच मिळत नसल्याने ही दोन्ही कामे सध्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी सेनेचे ठिगळे, अरुण माने यांच्यासह सुमारे तीनशे ते चारशे शेतकऱ्यांनी आज बुधवारी देविखिंडी येथे टेंभू योजनेच्या बोगद्याजवळ जाऊन पाणी अडविणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल होती.आज बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्यासह सुमारे ५० ते ६० पोलिसांचा ताफा आंदोलनस्थळी दाखल झाला. त्यानंतर पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्ते दाखल झाले. त्यावेळी टेंभूचे कार्यकारी अभियंता डी. एस. मोहिते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी अभियंता मोहिते यांनी आंदोलकांना टप्पा क्र. ४ व ५ करिता लागणाऱ्या विद्युत जोडणी संबंधीचे कळयंत्र आवारातील ३३ केव्ही ट्रान्स्फॉर्मर उभारणीचे काम प्रगतीपथावर असून, उर्वरित कामांना तांत्रिक मंजुरी घेऊन निविदा कार्यवाही हाती घेण्यात येईल, असे सांगितले.मात्र यामुळे आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे भक्तराज ठिगळे, लहू पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी टेंभूच्या कालव्याकडे आपला मोर्चा वळवला. त्याचवेळी विटा पोलिसांनी ठिगळे, लहू पाटील यांच्यासह आठ आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, सांगोला तालुक्यात जाणारे टेंभू योजनेचे पाणी अडविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी मुबारक शेख, विलास शिंदे, मारुती शिंदे, कुंडलिक बाबर, तानाजी बाबर, सोमनाथ वाले, अरविंद निकम, सयाजी निकम, प्रकाश निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)