शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

दोनशेवर संस्थांच्या निवडणुकीस मंजुरी

By admin | Updated: November 12, 2014 23:30 IST

निवडणूक प्राधिकरण : पाच डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण

सांगली/मिरज : जिल्ह्यातील ‘क’ गटात मोडणाऱ्या २0९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीस निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, येत्या ५ डिसेंबरपर्यंत या निवडणुका पार पाडण्यात येणार आहेत. ‘ड’ गटातील ११४ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रियाही आता शेवटच्या टप्प्यात आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत मिरज तालुक्यातील ‘ड’ वर्गातील शंभर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. ३१ आॅक्टोबर १४ पर्यंत संचालक मंडळाची मुदत संपलेल्या गृहनिर्माण मंडळाची मुदत संपलेल्या गृहनिर्माण मजूर व पाणीपुरवठा संस्थांचा यात समावेश आहे. तालुक्यात १ हजार ३४६ सहकारी संस्था आहेत. या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक दर पाच वर्षांनी होणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत सहकार कायदा दुरुस्ती, त्यानंतर दुष्काळामुळे सहा महिन्यांसाठी निवडणुका लांबणीवर गेल्या. २०१३ पासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास आता प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने या संस्थांची मतदारयादी तयार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी सांगितले. सहकारी संस्था निवडणुकीसाठी स्वतंत्र प्राधिकरणाच्या निर्मितीच्या प्रतीक्षेत तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. १६८ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. प्राधिकरण अस्तिवात आल्यानंतर प्राधिकरणाच्या मंजुरीने आता सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. उपनिबंधकांचे निवडणूक घेण्याचे अधिकार प्राधिकरणाकडे देण्यात आले, मात्र मतदारयाद्या तयार करण्यापासून निवडणूक कार्यक्रम पार पाडण्याचे काम उपनिबंधक कार्यालय व सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांकडेच सोपविले आहे. (प्रतिनिधी)सहकारी संस्थांची चार भागात विभागणीसहकारी संस्थांचे अ, ब, क, ड असे विभाग करण्यात आले आहेत. राज्य सहकारी संस्था, जिल्हा बँका, साखर कारखाने ‘अ’ गटात, नागरी बँका, विकास सोसायट्या, प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलन असलेल्या दूध संघ, पतसंस्था, खरेदी-विक्री संघ व एक कोटी रुपयापेक्षा जास्त भांडवल असलेल्या संस्था ब गटात, दोनशेपेक्षा जास्त सदस्य संस्था असलेल्या विकास संस्था पगारदार संस्था, औद्यागिक संस्था ‘क’ गटात व दोनशेपर्यंत सदस्य असलेल्या गृहनिर्माण मजूर, पाणीपुरवठा संस्थांचा ‘ड’ गटात समावेश आहे. ‘ड’ गटातील छोट्या संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर ‘क’ गटातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक पात्र संस्थागृहनिर्माणमजूरपाणी एकूणमिरज२०८७३५कवठेमहांकाळ१३८२४१जत७५१४२६तासगाव२२७१३०पलूस----१०१०कडेगाव--८--८आटपाडी२१६७२५वाळवा१७--११८शिराळा--१२४२६एकूण४९११४४६२०९(दि. १/४/२०१३ ते दि. ३१/१०/२०१४ अखेर पात्र असलेल्या)