शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विट्याच्या वादग्रस्त बांधकामांना मंजुरी

By admin | Updated: February 13, 2016 00:25 IST

जिल्हा परिषद सभा : बांधकामांना पूर्वी विरोध करणारे सभेमध्ये गप्पच कसे?

सांगली : खानापूर पंचायत समितीकडून विटा येथे मोक्याच्या जागेत १८ दुकान गाळे बांधले आहेत. येथील विटा तालुका नगरवाचनालय आणि जीवनप्रबोधिनी संस्थेने बांधकाम परवाना न घेताच पहिल्या मजल्यावर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या प्रश्नावर काँग्रेस सदस्यांनी अनेक सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच दोन्ही संस्थांकडूनही परस्पर तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. परंतु, वरील दोन्ही वादग्रस्त विषय शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आल्यानंतर कुणीच त्यास विरोध केला नाही. एका मिनिटात विषय मंजूर झालेला सदस्यांना कळलाच नाही. यामागचे नक्की कारण काय, असा प्रश्न सभा संपल्यानंतर काही सदस्यांनी उपस्थित केला. तसेच पूर्वी विरोध करणाऱ्यांनीही सभेत विषय आल्यानंतर चर्चाच का केली नाही, अशीही चर्चा रंगली आहे.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एक ते २७ विषयांना अर्ध्या तासामध्ये मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेत गेल्या सहा महिन्यांपासून विटा येथील पंचायत समितीच्या गाळ्यांचा विषय गाजत आहे. येथील १८ गाळ्यांवर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी कोणताही परवाना न घेताच बांधकाम केले होते. यामध्ये विटा तालुका नगरवाचनालय यांनी १८ दुकान गाळ्यांच्या संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील १२८ चौरस मीटर रिकाम्या जागेत बांधकाम केले आहे. येथील पहिल्या मजल्यावरीलच रिकाम्या मोकळ्या जागेत जीवनप्रबोधिनी यांनी ३५२.१८ चौरस मीटर रिकाम्या जागेत बांधकाम केले आहे. या संस्थांनी बांधकाम केलेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कोणतीही कल्पना नव्हती. शिवाय, त्यांच्याकडून भाडेही वसूल झाले नाही. याशिवाय १८ गाळ्यांचेही नियमित भाडे वसूल नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. या प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेबरोबरच बांधकाम समिती सभेतही मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. याच ठिकाणी सामान्य जनता असती, तर लगेच अधिकाऱ्यांनीही कारवाई केली असती. परंतु, या दोन्ही संस्थांच्या बांधकामाबाबत अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही मौन बाळगले. शेवटी शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारीला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या विषयास मंजुरी देण्यात आली. यावेळी एकाही सदस्याने चर्चेची विनंती केली नाही. यामुळे वादग्रस्त मुद्दा एकदम शांततेत मंजूर होण्याचे नक्की कारण काय, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला.या सभेस उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, पपाली कचरे, मनीषा पाटील, उज्ज्वला लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विट्याच्या वादग्रस्त बांधकामांना मंजुरीजिल्हा परिषद सभा : बांधकामांना पूर्वी विरोध करणारे सभेमध्ये गप्पच कसे?सांगली : खानापूर पंचायत समितीकडून विटा येथे मोक्याच्या जागेत १८ दुकान गाळे बांधले आहेत. येथील विटा तालुका नगरवाचनालय आणि जीवनप्रबोधिनी संस्थेने बांधकाम परवाना न घेताच पहिल्या मजल्यावर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या प्रश्नावर काँग्रेस सदस्यांनी अनेक सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच दोन्ही संस्थांकडूनही परस्पर तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. परंतु, वरील दोन्ही वादग्रस्त विषय शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आल्यानंतर कुणीच त्यास विरोध केला नाही. एका मिनिटात विषय मंजूर झालेला सदस्यांना कळलाच नाही. यामागचे नक्की कारण काय, असा प्रश्न सभा संपल्यानंतर काही सदस्यांनी उपस्थित केला. तसेच पूर्वी विरोध करणाऱ्यांनीही सभेत विषय आल्यानंतर चर्चाच का केली नाही, अशीही चर्चा रंगली आहे.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एक ते २७ विषयांना अर्ध्या तासामध्ये मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेत गेल्या सहा महिन्यांपासून विटा येथील पंचायत समितीच्या गाळ्यांचा विषय गाजत आहे. येथील १८ गाळ्यांवर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी कोणताही परवाना न घेताच बांधकाम केले होते. यामध्ये विटा तालुका नगरवाचनालय यांनी १८ दुकान गाळ्यांच्या संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील १२८ चौरस मीटर रिकाम्या जागेत बांधकाम केले आहे. येथील पहिल्या मजल्यावरीलच रिकाम्या मोकळ्या जागेत जीवनप्रबोधिनी यांनी ३५२.१८ चौरस मीटर रिकाम्या जागेत बांधकाम केले आहे. या संस्थांनी बांधकाम केलेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कोणतीही कल्पना नव्हती. शिवाय, त्यांच्याकडून भाडेही वसूल झाले नाही. याशिवाय १८ गाळ्यांचेही नियमित भाडे वसूल नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. या प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेबरोबरच बांधकाम समिती सभेतही मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. याच ठिकाणी सामान्य जनता असती, तर लगेच अधिकाऱ्यांनीही कारवाई केली असती. परंतु, या दोन्ही संस्थांच्या बांधकामाबाबत अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही मौन बाळगले. शेवटी शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारीला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या विषयास मंजुरी देण्यात आली. यावेळी एकाही सदस्याने चर्चेची विनंती केली नाही. यामुळे वादग्रस्त मुद्दा एकदम शांततेत मंजूर होण्याचे नक्की कारण काय, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला.या सभेस उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, पपाली कचरे, मनीषा पाटील, उज्ज्वला लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद स्वीय निधीतील एक कोटी पंचवीस लाखांच्या यशवंत घरकुल योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना केवळ २०१५-१६ या वित्तीय वर्षापुरतीच मर्यादित देत असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनास या वर्षात योजनेचा निधी खर्च करताना कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे. याच धर्तीवर ग्रामीण भागातील केशकर्तनालयांना ७५ टक्के अनुदानावर अद्ययावत खुर्ची पुरविण्यासाठीही मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना राबविण्यास अडचण निर्माण होईल, असे अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले आहे. ही योजना कशापध्दतीने राबवायची, याचे धोरणच निश्चित झाले नाही.