ते पुढे म्हणाले, समाजकल्याण समिती सभेत विविध विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच दलितवस्ती योजनेतील कामाबाबत चर्चा झाली. मिरज तालुक्यातील १४९ कामांना सहा कोटी ८५ लाख, वाळवा तालुक्यातील १४३ कामांना सहा कोटी ७५ लाख, शिराळा तालुक्यातील २९ कामांना एक कोटी ५६ लाख, कडेगाव तालुक्यातील ५४ कामांना दोन कोटी २३ लाख, पलूस तालुक्यातील ३८ कामांना एक कोटी ९५ लाख, तासगाव तालुक्यातील ९७ कामांना चार कोटी ७१ लाख, खानापूर तालुक्यातील ७९ कामांना तीन कोटी ३० लाख, आटपाडी तालुक्यातील ४३ कामांना एक कोटी २३ लाख, जत तालुक्यातील ११२ कामांना पाच कोटी १३ लाख, कवठेमहांकाळ तालुक्यातील ३७ कामांना एक कोटी ९६ लाख असे एकूण सुमारे ३५ कोटी रुपयांची कामे मंजूर केले आहेत. तसेच आखणी २० कोटींच्या कामांच्या प्रस्तावांना लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे. यातून रस्ते, गटारी, खडीकरण, समाजमंदिरे, पथदिवे यासह अन्य विकासकामे केली जाणार आहेत. अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही शेंडगे यांनी दिल्या. वैयक्तिक लाभांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर केल्यास त्यास पुढील सभेत मंजुरी देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सभेला सदस्य सरदार पाटील, अश्विनी पाटील, राजश्री एटम, नीलम सकटे, महादेव पाटील, मोहन रणदिवे, भगवान वाघमारे, समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.